Lokrakshanay
Sunday, March 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

जातनिहाय आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेला ‘वंचित’ला निवडून द्या: प्रकाश आंबेडकर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 2, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
जातनिहाय आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेला ‘वंचित’ला निवडून द्या: प्रकाश आंबेडकर
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : शिकलेल्या वर्गाला मग तो डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस, वकील किंवा खासगी कंपनीत काम करणारा असेल यातील ज्यांनी लाभ घेतला आहे त्यांना आरक्षण या पुढे मिळणार नाही. या मताचे आपण आहात का ? नसाल, तर या निवडणुकीत जोरदारपणे मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मत द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

सुप्रीम कोर्टाने एससी, एसटी यांच्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय देताना एससी आणि एसटीमध्ये वर्गीकरण झाले पाहिजे आणि त्याच सोबत क्रिमीलेयर हे तत्त्व सुद्धा लागू झाले पाहिजे. असा तो निर्णय आहे. या निर्णयाच्या संदर्भात मी आयएएस अधिकाऱ्यांशी बोललो, खासगी कंपनीत उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींशी बोललो. या दोन्ही वर्गाला क्रिमीलेयर कळलं नाही. त्यामुळे ते या निर्णयाला महत्व देत नसल्याचे ॲड. आंबेडकरांनी म्हटले आहे.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने क्रिमीलेयर ठरवताना त्यांनी क्रिमिलेयरची व्याख्या केली. ही व्याख्या करत असताना कोर्टाने असे म्हटले आहे की, एखादे अनुसूचित जाती किंवा जमाती मधील कुटुंब यांनी आरक्षणाचा लाभ घेतला असेल, तर यानंतर त्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. याचाच अर्थ आपण आरक्षणाचे लाभार्थी असाल तर आपले कुटुंब आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार नाही. हा निर्णय कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत भारतीय जनता पक्षाने केले आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा केले आहे. काँग्रेसशासित दोन राज्यांत अंमलबजावणी करण्याची घोषणा सुद्धा त्यांनी केली आहे.

मी ज्या आयएएस आणि खासगी कंपन्यांतील अधिकाऱ्यांशी बोललो, ते म्हणाले की हा निर्णय लागू होणार नाही. त्यांचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. सुप्रीम कोर्टाने एकदा निकाल दिला की तो लागू होतो. जी राज्ये हे लागू करायला निघाले आहेत त्यांच्यावर क्रिमीलेयर हे बंधनकारक आहे.उद्या जर याचा कायदा केला जाईल, त्यावेळी एखाद्या कुटुंबाने जर लाभ घेतला असेल त्याला लाभ मिळणार नाही. अशी व्याख्या केली आहे आणि निर्णयामध्ये तसे नमूद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

फुले, शाहू, आंबेडकरी जनतेला हा निर्णय मान्य आहे का ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, ज्या राजकीय पक्षाला आपण लोकसभेत मतदान केले. ज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) असेल या सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यामुळे आरक्षण थेट संपत नसल्याने क्रिमीलेयरच्या माध्यमातून संपवण्याचे काम सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीने अगोदरच या निर्णयाला विरोध केला आहे. आपणही विरोध करणार असाल तर येणाऱ्या विधानसभेत वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवाराला मतदान द्या, असे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी केले.

 

Previous Post

माहिती अधिकार कायद्यात सामान्य माणसाला दक्ष नागरिक घडविण्याची ताकद

Next Post

मद्रास उच्च न्यायालयाने जग्गी वासुदेव म्हणजेच सद्गुरूंना फटकारले

Next Post
मद्रास उच्च न्यायालयाने जग्गी वासुदेव म्हणजेच सद्गुरूंना फटकारले

मद्रास उच्च न्यायालयाने जग्गी वासुदेव म्हणजेच सद्गुरूंना फटकारले

BreakingNews

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे ही काळाची गरज – डॉ. राम पुनियानी

युद्धभूमीतून प्रवास यशस्वी! होर्मुझ सामुद्रधुनी पार करून पहिले तेलवाहू जहाज मुंबईत दाखल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.