Lokrakshanay
Tuesday, February 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

हॅकरचा थेट पोलिसावरच डल्ला; विना ओटीपी व्यवहार झाल्याने बँक रडारवर!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 16, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
हॅकरचा थेट पोलिसावरच डल्ला; विना ओटीपी व्यवहार झाल्याने बँक रडारवर!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : सायबर ठगांकडून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाल्याचे आपण ऐकले असाल. कोणाची डिजीटल अटक करुन फसवणूक केली जाते, तर कोणाला शेअर बाजारातील प्रलोभन दाखवून फसविले जाते. परंतु ठाणे पोलीस दलातील कर्मचाऱ्याचीच ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या पोलिसाने हॅकरला बँक खात्यातील कोणतीही माहिती पुरविली नव्हती. असे असतानाही फसवणूक झाल्याने त्याने आता बँकेविरुद्धच दंड थोपटले. त्याने बँकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फसवणूकीचा नेमका प्रकार काय ? ठाणे पोलीस (Thane Police) दलातील परिमंडळ एकमधील कार्यालयात फसवणूक झालेले कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे खासगी क्षेत्रातील एका मोठ्या बँकेत खाते आहे. १० फेब्रुवारीला ते रात्री घरी आले असता, त्यांच्या मोबाईल क्रमांकावर दोन संदेश प्राप्त झाले होते. यातील एका संदेशात ५० हजार रुपये तर दुसऱ्या संदेशात २८ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यातून कापल्याचे लिहीले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी तात्काळ बँकेत (Bank) धाव घेऊन विचारणा केली असता, त्यांचे इ-मेल खाते आणि मोबाईल अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याचे सांगण्यात आले. तसेच, त्यांच्या खात्यातून कर्ज देखील घेण्यात आले होते. त्यांनी खात्याची पडताळणी केली असता, त्यांच्या खात्यावर ७३ हजार ५४० रुपयांचे कर्ज घेतल्याचे समोर आले. तसेच, ७३ हजार रुपयांची मुदत ठेव देखील एका व्यक्तीच्या नावाने ठेवली होती. त्यांच्या खात्यात ११ हजार ३०० रुपये होते. फसवणूक करणाऱ्यांनी एकूण ८४ हजार ३०० रुपयांची फसवणूक त्यांची केली होती. क्रेडिट कार्डच्या नावानेही फसवणूक (cyber fraud) – १३ फेब्रुवारीला पुन्हा त्यांना बँकेचा एक संदेश प्राप्त झाला. त्यामध्ये त्यांचे क्रेडिट कार्ड हॅक करुन त्याद्वारे ५१ हजार ५३२ रुपये काढून त्यांच्या नावाने थकबाकी दाखविण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यांनी त्यासाठी कोणतीही संमती दिली नव्हती. तसेच त्यांच्याकडे कोणतेही क्रेडिट कार्ड नव्हते. याबाबत त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अखेर त्यांनी बँकच या फसवणूकीला व्यक्तीश: जबाबदार असल्याचे म्हणत कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे संबंधित बँक आणि हॅक करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

बाजार कर वसुली आता दुप्पट; पालिकेच्या तिजोरीत ४० कोटींची पडणार भर

Next Post

राज्यातील नववी-दहावीच्या वर्गांसाठी किमान २० विद्यार्थ्यांची पटसंख्या बंधनकारक

Next Post
राज्यातील नववी-दहावीच्या वर्गांसाठी किमान २० विद्यार्थ्यांची पटसंख्या बंधनकारक

राज्यातील नववी-दहावीच्या वर्गांसाठी किमान २० विद्यार्थ्यांची पटसंख्या बंधनकारक

BreakingNews

मुलुंड मेट्रो दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई! एक्झिक्युटिव्ह इंजिनियर निलंबित

राज्यातील नववी-दहावीच्या वर्गांसाठी किमान २० विद्यार्थ्यांची पटसंख्या बंधनकारक

हॅकरचा थेट पोलिसावरच डल्ला; विना ओटीपी व्यवहार झाल्याने बँक रडारवर!

बाजार कर वसुली आता दुप्पट; पालिकेच्या तिजोरीत ४० कोटींची पडणार भर

१० दिवसात फुटपाथवरील झोपड्या हटवा; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला फटकारे

राज्यातील आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी अनुभवणार ‘इस्रो’ सफरी!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.