Lokrakshanay
Wednesday, April 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 8, 2026
in Uncategorized, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यातील रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर खासगी बस वाहतुकीवर अधिक कडक देखरेख ठेवण्यासाठी राज्य परिवहन विभाग (आरटीओ) ”डिजिटल बस पोर्टल” विकसित करणार आहे. पोर्टल रस्ते सुरक्षा निधीतून तयार करण्यात येणार आहे. पोर्टलद्वारे सर्व नोंदणीकृत खाजगी बस एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर येतील. त्यामुळे बसचे मार्ग, बसची स्थिती, चालकाची पात्रता आणि कामाचे तास यांचा रिअल-टाईम मागोवा घेणे शक्य होईल.

गेल्या काही दिवसात खासगी बसचे अपघात वाढले आहेत. त्यामुळे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. सध्या बस परवाने हे संस्था, कंपन्या आणि ट्रस्ट यांना दिले जातात. परंतु बऱ्याच प्रकरणांमध्ये परवानाधारक आणि प्रत्यक्ष चालक या वेगवेगळ्या संस्था असतात. परवाना आणि ऑपरेटर डेटामधील तफावतीमुळे चिंता वाढली आहे. या तफावतीमुळे अधिकाऱ्यांकडे कालबाह्य किंवा अपूर्ण नोंदी असतात. परिणामी नियमांचे पालन होत आहे की नाही यावर देखरेख ठेवणे अवघड होते. प्रस्तावित प्रणालीनुसार, परवानाधारकांना प्रत्येक बस फेरीचे वेळापत्रक, मार्गाचा तपशील, वाहनाची योग्यता, चालक परवान्याची माहिती आणि कामाचे तास पोर्टलवर अद्ययावत करणे बंधनकारक असणार आहे. कोणताही बदल जसे की मार्ग चुकणे, वेळापत्रकात बदल किंवा चालकाने कर्तव्याच्या तासांपेक्षा जास्त काम केल्याची माहिती पोर्टलवर आपोआप नोंदवली जाईल. आरटीओ पोर्टल जीपीएस प्रणालीशी जोडण्याचाही विचार करीत आहे. त्यामुळे प्रवाशांनाही बसचे स्थान आणि वेगाची माहिती मिळू शकेल. या पोर्टलमुळे खाजगी बस व्यवसायात अधिक पारदर्शकता येईल.

डिजिटल बस पोर्टलची प्रमुख वैशिष्ट्ये :

  • राज्यातील सर्व खाजगी बसचा एकच डिजिटल डेटाबेस
  • बस फिटनेस प्रमाणपत्राची स्थिती ऑनलाइन अद्ययावत केली जाईल.
  • मार्ग, वेळापत्रक आणि परवानगीचा तपशील अपलोड करावा.
  • चालक परवान्याचा तपशील आणि कामाचे तास नोंदवणे बंधनकारक
  • मार्गातील बदल किंवा अतिरिक्त कामाच्या तासांसाठी स्वयंचलित सूचना
  • स्थान आणि वेग ट्रॅकिंगसाठी जीपीएसची जोड
Previous Post

गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

BreakingNews

खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा

ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांनी ओलांडला शंभरीचा टप्पा

राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी ‘पिंक रूम’! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.