ठाणे : येत्या आंबिया बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा याकरिता कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. सन २०२५-२६ च्या आंबिया बहाराकरिता योजनेमध्ये सहभागाची प्रक्रिया सुरु झाली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी निर्धारीत केलेल्या कालावधीत योजनेमध्ये सहभागी होऊन कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, अवेळी पाऊस या हवामान धोक्यापासून फळबागांचे संरक्षण करा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे शिवाजी आमले यांनी केले आहे.
योजनेची वैशिष्टये :
- कोकण विभागामध्ये अधिसूचीत केलेल्या महसूल मंडळात केळी, आंबा, काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल.
- कर्जदार शेतकरी व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल.
- खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही या योजना लागू राहील.
- एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकांसाठी मृग व आंबिया हे दोन्ही हंगाम मिळून जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल.
- शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरिता एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 10 हेक्टर अशी मर्यादा राहील.
- केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहील. (आंबा, काजू – ५ वर्ष)
- विमा अर्जासोबत फळबागेचा geo tagging असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील.
- एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग व आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच बहाराकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल.
- शेतकऱ्यांना इ-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.
- योजनेत सहभागी होण्याकरिता अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) अनिवार्य आहे.
- ही योजना ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी आणि रायगड जिल्ह्यामध्ये युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे.
- फळपिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत केळी पिकाकरीता दि.३१ ऑक्टोबर २०२५, काजू व आंबा पिकाकरिता दि.३० नोव्हेंबर २०२५ आहे.
विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर (रु./हेक्टर) :
- ठाणे जिल्हा:-आंबा फळपिक – विमा संरक्षित रक्कम – १ लाख ७० हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – १७ हजार.
- काजू फळपिक – विमा संरक्षित रक्कम – १ लाख २० हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – ६ हजार.
- केळी फळपिक – विमा संरक्षित रक्कम – १ लाख ७० हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – ८ हजार ५००.
- पालघर जिल्हा :- आंबा फळपिक – विमा संरक्षित रक्कम – १ लाख ७० हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – २१ हजार २५०.
- काजू फळपिक – विमा संरक्षित रक्कम – १ लाख २० हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – ६ हजार.
- केळी फळपिक – विमा संरक्षित रक्कम – १ लाख ७० हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – ८ हजार ५००.
- रायगड जिल्हा:- आंबा फळपिक – विमा संरक्षित रक्कम – १ लाख ७० हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – १४ हजार ४५०.
- काजू फळपिक – विमा संरक्षित रक्कम – १ लाख २० हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – ६ हजार.
- रत्नागिरी जिल्हा:- आंबा फळपिक – विमा संरक्षित रक्कम – १ लाख ७० हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – १३ हजार ६००.
- काजू फळपिक – विमा संरक्षित रक्कम – १ लाख २० हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – ६ हजार.
- सिंधुदुर्ग जिल्हा:- आंबा फळपिक – विमा संरक्षित रक्कम – १ लाख ७० हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – ८ हजार ५००.
- काजू फळपिक – विमा संरक्षित रक्कम – १ लाख २० हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – ६ हजार.
- केळी फळपिक – विमा संरक्षित रक्कम – १ लाख ७० हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – ८ हजार ५००.