Lokrakshanay
Friday, July 31, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

‘नशा मुक्त भारत अभियान २०२६’ अंतर्गत ठाण्यात जिल्हास्तरीय विविध स्पर्धा उत्साहात संपन्न

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 30, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
‘नशा मुक्त भारत अभियान २०२६’ अंतर्गत ठाण्यात जिल्हास्तरीय विविध स्पर्धा उत्साहात संपन्न
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे येथे युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या ‘मेरा युवा भारत’ (MY Bharat) – ठाणे आणि नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशा मुक्त भारत अभियान २०२६’ अंतर्गत “नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत” या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. VPM’s B. N. Bandodkar College, ठाणे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध मराठी अभिनेते कुशल भद्रिके, अभिजित चव्हाण आणि संतोष जुवेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विंदा मांजरमकर, उपप्राचार्या प्रा. प्रीती जांभुळकर तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी युवकांना व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन करत “नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत” या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून विकसित भारताच्या उभारणीत योगदान देण्याचे आवाहन केले. या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवती, महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक मंडळे आणि स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. संगीत व रॅप (गट), थीमॅटिक नृत्य (गट), रील मेकिंग व लघुपट निर्मिती, नुक्कड नाटक, स्लॅम पोएट्री, वादविवाद व वक्तृत्व, चित्रकला आणि घोषवाक्य लेखन अशा एकूण आठ विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धकांनी आपल्या कला, सर्जनशीलता आणि प्रभावी सादरीकरणाच्या माध्यमातून व्यसनमुक्त भारताचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमामुळे युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत झाली असून, सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली.

स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना मेरिट प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरविण्यात आले, तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्रत्येक स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवणारे स्पर्धक आता राज्यस्तरीय स्पर्धेत ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असून, राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे युवकांना त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच सामाजिक विषयांवर सकारात्मक संदेश देण्याची संधीही उपलब्ध झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये MY Bharat – ठाणेच्या जिल्हा युवा अधिकारी श्रीमती मनीषा शर्मा यांचे विशेष योगदान लाभले. त्यांच्या प्रभावी नियोजन, कुशल मार्गदर्शन आणि समन्वयामुळे संपूर्ण स्पर्धांचे यशस्वी आयोजन व सुरळीत संचालन शक्य झाले. कार्यक्रमाच्या यशासाठी MY Bharat – ठाणे, नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC), VPM’s B. N. Bandodkar College, उपस्थित मान्यवर, स्वयंसेवक, स्पर्धक तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था आणि व्यक्तींचे आभार व्यक्त करण्यात आले. “नशामुक्त भारत – विकसित भारत” या राष्ट्रीय अभियानाला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांमुळे युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचला असून, समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.

Previous Post

HSRP नंबर प्लेटसाठी ३१ डिसेंबरची डेडलाईन; मंत्री-आमदारांनाही सूट नाही!

Next Post

अंगणवाडीतील पोषण आहाराचा ‘मेन्यू’ बदलला; बालकांना आता पुलाव आणि पौष्टिक पदार्थांची मेजवानी

Next Post
अंगणवाडीतील पोषण आहाराचा ‘मेन्यू’ बदलला; बालकांना आता पुलाव आणि पौष्टिक पदार्थांची मेजवानी

अंगणवाडीतील पोषण आहाराचा 'मेन्यू' बदलला; बालकांना आता पुलाव आणि पौष्टिक पदार्थांची मेजवानी

BreakingNews

२५ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! हाजुरीतील १९ कुटुंबांना मिळाल्या हक्काच्या घरांच्या चाव्या

आता मिळणार पतंजलीचा विमा; योगगुरू बाबा रामदेव यांचे विमा क्षेत्रात पाऊल!

१० ऑगस्टला देशभर ‘जेल भरो’ आणि ‘रास्ता रोको’ आंदोलनाची घोषणा

अंगणवाडीतील पोषण आहाराचा ‘मेन्यू’ बदलला; बालकांना आता पुलाव आणि पौष्टिक पदार्थांची मेजवानी

‘नशा मुक्त भारत अभियान २०२६’ अंतर्गत ठाण्यात जिल्हास्तरीय विविध स्पर्धा उत्साहात संपन्न

HSRP नंबर प्लेटसाठी ३१ डिसेंबरची डेडलाईन; मंत्री-आमदारांनाही सूट नाही!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.