Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

उच्च न्यायालयाकडून एका महिलेसह दोघांविरोधातील गुन्हा रद्द; करोना काळात महापालिकेचे बनावट ओळखपत्र वापरल्याचा आरोप

करोना काळात महापालिकेचे बनावट ओळखपत्र वापरल्याच्या आरोपाप्रकरणी एका महिलेसह दोघांना उच्च न्यायालयाचा दिलासा दिला.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 29, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
उच्च न्यायालय वांद्रे ऐवजी गोरेगावला स्थलांतरित होण्याची शक्यता
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : करोना काळात महापालिकेचे बनावट ओळखपत्र वापरल्याच्या आरोपाप्रकरणी एका महिलेसह दोघांना उच्च न्यायालयाचा दिलासा दिला. या दोघांविरोधातील गुन्हा न्यायालयाने रद्द केला. गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी चितन संघवी आणि दीपाली गायकवाड या दोघांनी केलेल्या याचिका न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकलपीठाने मान्य केल्या. तसेच, त्यांना दिलासा दिला. दोघांवर फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, रेल्वे किंवा सरकारची फसवणूक करण्याच्या उद्देशाने याचिकाकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे, त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आरोप अयोग्य असल्याचे नमूद करून न्यायालयाने उपरोक्त आदेश देताना स्पष्ट केले.

करोना काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. गायकवाड ही महापालिकेच्या बनावट ओळखपत्राच्या आधारे प्रवास करत असल्याचे रेल्वे निरीक्षकाच्या लक्षात आले. त्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी, संघवी यानेही असेच बनावट ओळखपत्र तयार केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर, दोघांवर फसवणूक करण्याच्या हेतुने बनावट ओळखपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. दोघांनी गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायालयाने गायकवाड आणि संघवी याची याचिका योग्य ठरवताना महानगरदंडाधिकाऱ्यांनी त्यांना बाजू मांडण्याची संधीच दिली नसल्याचे सादर केलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत असल्याचे नमूद केले. तसेच, कायद्याच्या संबंधित तरतुदींचे पालन न करता याचिकाकर्त्यांवर आरोपनिश्चित करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने दोघांना दिलासा देताना स्पष्ट केले. या दोघांना त्यांची बाजू मांडण्याची संधी का दिली नाही याचे स्पष्टीकरणही सरकारी वकील देऊ शकले नाहीत. याशिवाय, या दोघांवर आरोपनिश्चिती करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचेही स्पष्ट होते, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांविरोधातील गुन्हा रद्द करताना म्हटले.

Previous Post

शेतकऱ्यांसह सर्वांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Next Post

शहरातील किंवा बाहेरच्या नेत्यांनी माझ्या शहराचं नाव खराब करू नये : मुरलीधर मोहोळ

Next Post
शहरातील किंवा बाहेरच्या नेत्यांनी माझ्या शहराचं नाव खराब करू नये : मुरलीधर मोहोळ

शहरातील किंवा बाहेरच्या नेत्यांनी माझ्या शहराचं नाव खराब करू नये : मुरलीधर मोहोळ

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.