Lokrakshanay
Thursday, November 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

दाऊदशी संबंधित ‘मुसाफिरखाना’ इमारतीवर BMC चा बुलडोझर; ८७ वर्षे जुने बांधकाम पाडण्यास सुरुवात!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 19, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
दाऊदशी संबंधित ‘मुसाफिरखाना’ इमारतीवर BMC चा बुलडोझर; ८७ वर्षे जुने बांधकाम पाडण्यास सुरुवात!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) भेंडी बाजार परिसरातील ८७ वर्षे जुन्या ‘हाजी इस्माईल हाजी हबीब मुसाफिरखाना’ या धोकादायक इमारतीच्या पाडकामाला गुरुवारी सुरुवात केली. एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाशी संबंधित असल्याने चर्चेत असलेल्या या इमारतीवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या माहितीनुसार, सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (SBUT) यांनी इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण व धोकादायक असल्याचे नमूद करत ती पाडण्याची विनंती केली होती. ऑगस्ट २०२० मधील मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रहिवाशांचे पुनर्वसन करून इमारत पाडण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही इमारत एसबीयुटीच्या क्लस्टर पुनर्विकास योजनेच्या ‘सेक्टर ८’ मध्ये असून, तिचा काही भाग प्रस्तावित रस्त्याच्या आराखड्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. बीएमसीच्या ‘सी’ विभाग कार्यालयाने १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत नोटीस बजावली होती. त्यानुसार १८ किंवा १९ नोव्हेंबर रोजी कारवाईचे नियोजन करण्यात आले होते. काही कारणांमुळे बुधवारी काम सुरू होऊ शकले नव्हते. मात्र गुरुवारी सकाळपासून यंत्रसामग्रीच्या सहाय्याने पाडकामाला सुरुवात करण्यात आली. महापौर रितू तावडे यांनी ही कारवाई न्यायालयीन आदेशानुसार आणि प्रशासनाच्या नियमानुसार होत असल्याचे सांगत, मुंबईतील धोकादायक व अनधिकृत बांधकामांवर आवश्यक ती कारवाई सुरू राहील, असे स्पष्ट केले. भेंडी बाजारातील ही इमारत दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाचे जुने निवासस्थान म्हणून ओळखली जात होती. तसेच १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांच्या कटाशीही या वास्तूचा संबंध असल्याचे विविध अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, सध्या सुरू असलेली कारवाई ही इमारतीची धोकादायक अवस्था, पुनर्विकास योजना आणि न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने करण्यात येत असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

Previous Post

पनवेलमध्ये डासांचा विळखा कायम! ‘१०० कर्मचारी फवारणीसाठी कार्यरत’; पालिका प्रशासनाचा दावा

BreakingNews

दाऊदशी संबंधित ‘मुसाफिरखाना’ इमारतीवर BMC चा बुलडोझर; ८७ वर्षे जुने बांधकाम पाडण्यास सुरुवात!

पनवेलमध्ये डासांचा विळखा कायम! ‘१०० कर्मचारी फवारणीसाठी कार्यरत’; पालिका प्रशासनाचा दावा

ब्रिक्स+ चित्रपट महोत्सवात छाया कदम यांचा सन्मान; ‘स्नो फ्लॉवर’मधील अभिनयाला आंतरराष्ट्रीय गौरव

पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद; आता थेट पुढील वर्षीच प्रवाशांसाठी खुला होणार

अंजूरमध्ये गरोदर व स्तनदा मातांना पोषण किटचे वाटप; माता-बालकांच्या आरोग्यासाठी संयुक्त उपक्रम

नागपुरात रंगणार ६९वे महाराष्ट्र केसरी पर्व; २० ते २४ जानेवारीदरम्यान १,३०० मल्लांची दमदार लढत

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

imunify-bot-check