Lokrakshanay
Sunday, March 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 14, 2026
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, मुंबई
वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या गॅस टंचाईचा फायदा घेत काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मुंबईतील वरळी परिसरात वीज वितरण विभाग आणि संबंधित पथकाने मोठी कारवाई करत गॅस सिलिंडरचा साठा जप्त केला आहे. वरळीतील गॅस साठ्यावर टाकलेल्या छाप्यानंतर या प्रकरणातील धक्कादायक तपशील समोर आले आहेत. ही टोळी केवळ साठवणूकच करत नव्हती, तर मोठ्या प्रमाणावर अवैध रिफिलिंगचा व्यवसाय चालवत होती. वरळी नाका येथील गणपतराव कदम मार्गावर असलेल्या सूरज वल्लभदास चाळ येथे हा छापा टाकण्यात आला. या ठिकाणी बेकायदेशीरपणे घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा करून ठेवल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात साठा उघडकीस आला.

काळाबाजार करणाऱ्यांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त झाले असून, गॅस टंचाईच्या काळात सामान्य नागरिकांची होणारी फसवणूक रोखण्यास मदत झाली आहे.जप्त केलेले सिलिंडर कोणत्या एजन्सीचे आहेत आणि यामागे कोणाचे हात आहेत, याचा तपास प्रशासन करत आहे. वरळीतील कारवाईदरम्यान उघड झालेली माहिती अत्यंत धक्कादायक असून, प्रशासनाने यावर कडक भूमिका घेतली आहे. तपासानुसार, हे सिलिंडर काळ्या बाजारात चढ्या दराने विकले जात होते. मध्यपूर्वेतील युद्धामुळे गॅसचा तुटवडा असताना, अशा प्रकारच्या साठेबाजीमुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत भर पडत आहे. जप्त केलेले सर्व १७२ सिलिंडर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, पोलीस या रॅकेटचा अधिक तपास करत आहेत. दाट लोकवस्तीच्या निवासी क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर साठवणे हे ‘टाइम बॉम्ब’ सारखे असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. निवासी क्षेत्रात ज्वलनशील पदार्थांची अशा प्रकारे साठवणूक करणे अत्यंत धोकादायक आहे. थोड्याशा निष्काळजीपणामुळे मोठी आग लागून भीषण जीवितहानी होऊ शकते. नफेखोरीसाठी लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या साठेबाजांविरुद्ध यापुढेही शून्य सहनशीलता (Zero Tolerance) धोरण राबवले जाईल आणि कडक गुन्हे दाखल केले जातील.

Previous Post

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

BreakingNews

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे ही काळाची गरज – डॉ. राम पुनियानी

युद्धभूमीतून प्रवास यशस्वी! होर्मुझ सामुद्रधुनी पार करून पहिले तेलवाहू जहाज मुंबईत दाखल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.