Lokrakshanay
Sunday, June 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

सावधान! होळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईत भेसळ? FSSAI कडून देशव्यापी ‘स्पेशल ड्राईव्ह’ सुरू

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 25, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश
सावधान! होळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईत भेसळ? FSSAI कडून देशव्यापी ‘स्पेशल ड्राईव्ह’ सुरू
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : होळीचा सण जवळ येत असतानाच खाद्यपदार्थांमधील वाढती मागणी पाहता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न भेसळीविरोधात विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. सणासुदीच्या काळात नफा कमवण्यासाठी अनेकदा अन्नपदार्थांत भेसळ केली जाते, ज्याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो. हे टाळण्यासाठी ‘होळी अँटी-अडल्टरेशन ड्राईव्ह २०२६’ सुरू करण्यात आली आहे.

सणासुदीच्या काळात ज्या पदार्थांना सर्वाधिक मागणी असते, अशा वस्तूंच्या नमुन्यांची तपासणी करण्याचे आदेश अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मावा (खोया), पनीर, मिठाई, तूप, खाद्यतेल आणि नमकीन यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. भेसळ होण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणांची यादी तयार करून तिथे धाडी टाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ म्हणजेच फिरत्या प्रयोगशाळांचा वापर केला जाणार आहे. गर्दीच्या बाजारपेठांमध्ये या मोबाईल व्हॅन तैनात केल्या जातील, जिथे खाद्यपदार्थांची जागच्या जागी चाचणी केली जाईल. यामुळे ग्राहकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल आणि भेसळ करणाऱ्यांना चाप बसेल. ३१ मार्चपर्यंत या संपूर्ण कारवाईचा अहवाल केंद्र सरकारला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. एफएसएसएआयने स्पष्ट केले आहे की, सणासुदीच्या काळात होणारी भेसळ ही केवळ फसवणूक नसून सार्वजनिक आरोग्यासाठी मोठा धोका आहे. उत्पादक, वितरक आणि विक्रेते अशा सर्व स्तरांवर ही तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. निकृष्ट दर्जाचे किंवा आरोग्यास घातक असलेले पदार्थ बाजारात येणार नाहीत याची खात्री करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यामुळे नागरिकांना निर्भयपणे होळीचा सण साजरा करता येईल.

Previous Post

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा – राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

Next Post

अजित पवार विमान अपघात प्रकरण: DGCA कडून ‘त्या’ कंपनीच्या ४ विमानांवर बंदी!

Next Post
अजित पवार विमान अपघात प्रकरण: DGCA कडून ‘त्या’ कंपनीच्या ४ विमानांवर बंदी!

अजित पवार विमान अपघात प्रकरण: DGCA कडून 'त्या' कंपनीच्या ४ विमानांवर बंदी!

BreakingNews

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये भोवली! प्रणित मोरेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.