Lokrakshanay
Wednesday, April 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

उबर, ओला, रॅपिडोच्या अॅडव्हान्स टीपवर बंदी!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 26, 2025
in ताज्या बातम्या, राष्ट्रीय
उबर, ओला, रॅपिडोच्या अॅडव्हान्स टीपवर बंदी!
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : देशातील कॅब बुकिंग सेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल करत, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) मोटार वाहन अॅग्रिगेटर मार्गदर्शक तत्त्वे, २०२५ मध्ये दुरुस्ती जाहीर केली आहे. या दुरुस्तीअंतर्गत उबर, ओला, रॅपिडो आदी कॅब अॅप्सवर अॅडव्हान्स (पूर्व) टिपिंगवर पूर्णतः बंदी घालण्यात आली असून, महिला प्रवाशांसाठी बुकिंगच्या वेळी महिला चालक निवडण्याचा पर्याय देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रवास सुरू होण्यापूर्वी चालकाला आकर्षित करण्यासाठी किंवा लवकर पिकअप मिळावा यासाठी दिली जाणारी अॅडव्हान्स टिपिंग सुविधा पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. यापुढे कोणतीही ऐच्छिक टिपिंग सुविधा फक्त प्रवास पूर्ण झाल्यानंतरच उपलब्ध असावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. बुकिंगदरम्यान किंवा प्रवास सुरू असताना प्रवाशांना अतिरिक्त पैसे देण्यासाठी प्रवृत्त करता कामा नये, असा ठाम निर्देश मंत्रालयाने दिला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) यापूर्वीच अॅडव्हान्स टिपिंग ही अन्यायकारक व्यापार पद्धत असल्याचे नमूद केले होते. या पद्धतीमुळे कॅब बुकिंग प्रक्रिया बोलीसारखी बनत असून, जास्त पैसे देणाऱ्या प्रवाशांना प्राधान्य मिळते, तर सामान्य प्रवासी विशेषतः पीक अवर्समध्ये वंचित राहतात, असे प्राधिकरणाचे मत होते.

महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंत्रालयाने आणखी एक महत्त्वाची तरतूद केली आहे. त्यानुसार, उपलब्धतेनुसार महिला प्रवाशांना महिला चालक निवडण्याचा पर्याय देणे अॅग्रिगेटर प्लॅटफॉर्मसाठी बंधनकारक असेल. यामुळे महिला प्रवाशांना बुकिंगच्या वेळी महिला चालक निवडता येणार असून, कॅब सेवांमधील सुरक्षिततेला अधिक बळ मिळणार आहे. सध्या बहुतेक अॅग्रिगेटर प्लॅटफॉर्मवर महिला चालकांची संख्या ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ही सुविधा प्रभावीपणे राबवण्यासाठी अॅग्रिगेटर्सना अधिक महिला चालकांचा समावेश करावा लागू शकतो. यामुळे महिलांना नवनवीन संधी मिळतील. सुरुवातीच्या टप्प्यात या तरतुदीमुळे प्रतीक्षा कालावधी वाढण्याची किंवा उपलब्धतेची मर्यादा जाणवण्याची शक्यता आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रवाशांकडून मिळणारी पूर्ण टिप रक्कम कोणतीही कपात न करता थेट चालकाच्या खात्यात जमा करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

Previous Post

पुन्हा एकदा साडे माडे तीन : नव्या वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीस! रिलीज डेट जाहीर

Next Post

नवी मुंबईतील पंतप्रधान आवास प्रकल्पांची कामे बंद पडणार? पालिकेची ‘सिडको’ला नोटीस

Next Post
नवी मुंबईतील पंतप्रधान आवास प्रकल्पांची कामे बंद पडणार? पालिकेची ‘सिडको’ला नोटीस

नवी मुंबईतील पंतप्रधान आवास प्रकल्पांची कामे बंद पडणार? पालिकेची ‘सिडको’ला नोटीस

BreakingNews

खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा

ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांनी ओलांडला शंभरीचा टप्पा

राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी ‘पिंक रूम’! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.