Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्य सरकारला आली जाग, १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

निवडणूक आयोगाने मुंबईतील पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांची सूचना राज्य पोलीस दलाला केली होती.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 5, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्य सरकारला आली जाग, १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला होता. या दौऱ्याच्या शेवटी निवडणूक आयोगाने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगाने 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या. राज्य सरकारने या सूचनांचे पालन करत 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ११ पोलीस निरीक्षकांची बदली मुंबईत बदली झाली आहे. निवडणूक आयोगाने मुंबईतील पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांची सूचना राज्य पोलीस दलाला केली होती. मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या मुंबईबाहेर करण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने राज्य सरकारला अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या. त्या सूचना राज्य सरकारने पाळल्या नव्हत्या. त्यामुळे काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्टासह इतर 4 राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. या पत्रात 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आयोगाने राज्य सरकारवर ताषेरे ओढले होते.

लोकसभा निवडणुकीवेळी मुंबईतील अनेक मतदारसंघांवर झालेल्या गैरसुविधांबद्दलही निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली होती. मुंबईतील मतदान केंद्रांवर बेंच, पंखे , पिण्याचे पाणी सुविधा उपलब्ध असल्याचे खात्री करण्याचे अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोगाने आता राज्य सरकारला सूचना दिल्यानंतर आता राज्य सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला.

 

Previous Post

छत्तीसगडमध्ये चकमकीत ३५ हून अधिक नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

Next Post

दापोलीत विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्यात १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

Next Post
दापोलीत विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्यात १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

दापोलीत विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्यात १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.