मुंबई : लाडकी बहीण योजनेत महिलांनी ई केवायसी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान ई केवायसी करताना महिलांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधीकधी ओटीपी येत नाही तर कधीकधी साइट लोड होत नाही. दरम्यान, आता याची मंत्री आदिती तटकरेंनी दखल घेतली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याना E-KYC करताना येणाऱ्या अडचणींची मंत्री आदिती तटकरेंनी गंभीर दखल घेतलीय.
त्यांनी सोशल मीडियावर पोस्टकरुन. E-KYC मधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील असं आश्वासन दिलंय. ‘e-KYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होणार असंही त्यांनी म्हटलंय. महिला व बालविकास विभागाच्या पोर्टलवर ईकेवायसी करताना ओटीपीबाबत महिलांना तांत्रिक अडचणी येत असल्याचं समोर आलं होतं.लाडकी बहिण योजनेसाठी e-KYC बंधनकारक करण्यात आलीये.