Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आरोपी मिहीर शाह आहे तरी कोण? मुंबईत हिट अँड रन केस.

अपघात प्रकरणातला आरोप मिहीर शाह हा शिवसेना नेत्याचा मुलगा आहे तसंच त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 8, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
आरोपी मिहीर शाह आहे तरी कोण? मुंबईत हिट अँड रन केस.
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईतल्या वरळी भागात भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडण्याच्या प्रकरणात मिहीर शाह हे नाव समोर आलं आहे. आरोपी मिहीर शाह हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. राजेश शाह यांना अटक करण्यात आली आहे. मिहीर शाहचा शोध मात्र पोलीस घेत आहेत. अपघातानंतर मिहीर शाह त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी गेला होता ही माहिती समोर आल्याने पोलिसांनी तिचीही चौकशी केली आहे. बीएमबडब्ल्यू कारने रविवारी पहाटे नाखवा दाम्पत्याला भरधाव वेगात धडक दिली. यात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. हा मिहीर शाह कोण आहे जाणून घेऊ. मिहीर शाह हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. मिहीरचं शिक्षण १० वीपर्यंत झालं आहे, त्याने पुढे शिक्षण घेतलेलं नाही. राजेश शाह यांचा बांधकाम व्यवसाय आहे, याच व्यवसायात मिहीर त्यांना मदत करतो. अपघात रविवारी पहाटे झाला, मात्र मिहीर शाहने मद्यप्राशन केलं होतं. तो आणि त्याचा चालक लाँग ड्राईव्हवर आले. वरळीतून गोरेगावच्या दिशेने जात असताना मिहीर कार चालवत होता त्यावेळी त्याने नाखवा दाम्पत्याला धडक दिली. कावेरी नाखवा यांचा या अपघातात मृत्यू झाला. पहाटे ५.३० च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातानंतर आरोपीने शिवसेनेचं स्टिकर काढल्याचाही आरोप आहे. प्रदीप नाखवा यांनीही मिहीरच अपघाताच्या वेळी कार चालवत होता असं सांगितलं आहे. तसंच प्रत्यक्षदर्शींनीही तेच सांगितलं आहे. अपघात झाल्यापासून मिहीर फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत

समोर आलेल्या माहितीनुसार, हीट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह रात्री जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन करत होता. त्यानंतर तो गोरेगावला गेला. घरी गेल्यानंतर त्याने त्याच्या चालकाला सांगितलं की आपल्याला लाँग ड्राईव्हवर जायचं आहे. प्रवासादरम्यान तो मुंबईतल्या वरळी भागात आला. त्यानंतर पुन्हा गोरेगावला जायला निघाला. गोरेगावला जाताना मिहीर शाह स्वतः कार चालवत होता असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. तसंच जो अपघात झाला तो एट्रिया मॉलजवळ झाला. तिथपासून त्याने कावेरी नाखवा यांना फरपटत नेलं. हा अपघात झाला तेव्हा मिहीरने मद्यप्राशन केलं होतं. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अपघाताचे वर्णन करत असताना नाखवा यांना अश्रू अनावर झाले होते. ते म्हणाले, “वरळीतील सीजे हाऊस पासून ते वरळी सी लिंकपर्यंत त्या कारने माझ्या पत्नीला फरफटत नेले. तिच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता. दोन मुलांना टाकून माझी पत्नी आता गेली. आम्ही मासे विकून आमचा उदरनिर्वाह चालवतो. आता आम्ही जगायचे कसे? आज या पक्षाचे त्या पक्षाचे लोक एकमेकांवर टीका करत आहेत. पण मागून हे आरोपींनाच पाठिंबा देतात. आम्हाला कोण वाचवणार?” असा उद्विग्न प्रश्न प्रदीप नाखवा यांनी विचारला आहे.

Previous Post

ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा मन:स्ताप; पावसाच्या सुरवातीलाच घोडबंदर रस्ता खड्डेमय

Next Post

डोंबिवलीत पाण्याची गळती, हायप्रोफाईल गृहनिर्माण प्रकल्पामुळे घरे घेतलेल्या लोकांची निराशा.

Next Post
डोंबिवलीत पाण्याची गळती, हायप्रोफाईल गृहनिर्माण प्रकल्पामुळे घरे घेतलेल्या लोकांची निराशा.

डोंबिवलीत पाण्याची गळती, हायप्रोफाईल गृहनिर्माण प्रकल्पामुळे घरे घेतलेल्या लोकांची निराशा.

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.