Lokrakshanay
Friday, October 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

फटाका स्टॉलसाठी महापालिकेची परवानगी आणि ‘अग्निशामक NOC’ बंधनकारक!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 23, 2026
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
फटाका स्टॉलसाठी महापालिकेची परवानगी आणि ‘अग्निशामक NOC’ बंधनकारक!
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने फटाका विक्रेत्यांसाठी कडक नियम लागू केले आहेत. क्षेत्रीय कार्यालयाची अधिकृत परवानगी आणि अग्निशामक विभागाचा ना हरकत दाखला (एनओसी) घेतल्याशिवाय फटाका विक्रीचे स्टॉल उभारू नयेत, अन्यथा बेकायदा स्टॉलवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या अग्निशामक विभागाने दिला आहे. यंदा दिवाळी ५ नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याने फटाका विक्रीसाठी तयारी वेगाने सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या दहाही क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, त्यांच्या कार्यक्षेत्रातील फटाका विक्री केंद्रांची पाहणी करून परवानगी नसलेल्या स्टॉलवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फटाका दुकानासाठी जागेच्या स्वरूपानुसार सुमारे दोन ते अडीच हजार रुपये शुल्क आकारून अग्निशामक विभागाकडून परवानगी दिली जाते. आतापर्यंत शहरातील विविध भागांतून २३ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी एका विक्रेत्याला स्थळ पाहणीनंतर परवानगी देण्यात आली आहे. उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी कोणत्याही परिस्थितीत विनापरवाना फटाका विक्री करू नये, असे आवाहन केले आहे.

महापालिकेने फटाका विक्रीदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचनाही जारी केल्या आहेत. आगीचा धोका टाळण्यासाठी प्रत्येक स्टॉलजवळ वाळूची व्यवस्था ठेवणे, किमान एक ते पाच हजार लिटर पाण्याची उपलब्धता ठेवणे, परिसरात बिडी किंवा सिगारेट ओढण्यास सक्त मनाई करणे तसेच ज्वलनशील पदार्थ साठवू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. फटाका स्टॉलपासून लहान मुलांना सुरक्षित अंतरावर ठेवण्याचाही सल्ला प्रशासनाने दिला आहे. दरवर्षी शहरातील दहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर फटाका स्टॉल उभारले जात असले तरी अधिकृत परवानगी घेणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. गतवर्षी शहरात मोठ्या संख्येने स्टॉल उभारले गेले होते, मात्र केवळ १०० विक्रेत्यांनीच अधिकृत परवानगी घेतली होती. यामुळे यंदा अग्निशामक विभागाने नियमांचे काटेकोर पालन करण्याचा निर्णय घेतला असून, परवानगीशिवाय स्टॉल उभारणाऱ्यांवर क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous Post

ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलणार; चाचणीत ७५% गुण अनिवार्य!

Next Post

बाल्कनीत कपडे वाळवण्यास बंदी आणि मोकळ्या भूखंडांना हिरवी जाळी बंधनकारक; पुणे पालिकेचा विचार

Next Post
बाल्कनीत कपडे वाळवण्यास बंदी आणि मोकळ्या भूखंडांना हिरवी जाळी बंधनकारक; पुणे पालिकेचा विचार

बाल्कनीत कपडे वाळवण्यास बंदी आणि मोकळ्या भूखंडांना हिरवी जाळी बंधनकारक; पुणे पालिकेचा विचार

BreakingNews

बाल्कनीत कपडे वाळवण्यास बंदी आणि मोकळ्या भूखंडांना हिरवी जाळी बंधनकारक; पुणे पालिकेचा विचार

फटाका स्टॉलसाठी महापालिकेची परवानगी आणि ‘अग्निशामक NOC’ बंधनकारक!

ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलणार; चाचणीत ७५% गुण अनिवार्य!

एफडीएचा मोठा दणका! अस्वच्छता आणि नियमभंगामुळे मुंबईतील ९ खाद्य आस्थापनांवर टाळे

भिवंडीत दर बुधवारी १८ तासांची पाणीकपात; महापालिकेचा निर्णय

कोपरखैरणेतील पाणीटंचाई आणि कमी दाबाचा प्रश्न मिटणार; नव्या जलकुंभासाठी पालिकेचा विशेष पुढाकार!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.