Lokrakshanay
Friday, October 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

एफडीएचा मोठा दणका! अस्वच्छता आणि नियमभंगामुळे मुंबईतील ९ खाद्य आस्थापनांवर टाळे

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 23, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
एफडीएचा मोठा दणका! अस्वच्छता आणि नियमभंगामुळे मुंबईतील ९ खाद्य आस्थापनांवर टाळे
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईतील अन्नसुरक्षेला धक्का देणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील नऊ खाद्य आस्थापनांचे परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. या कारवाईमध्ये बेकरी, रेस्टॉरंट, बिर्याणी विक्री केंद्र आणि इतर खाद्य व्यवसायांचा समावेश आहे. एफडीएने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, माझगाव येथील एस. के. बेकरी, ग्रँट रोडवरील नेकझाद रेस्टॉरंट, वांद्रे पश्चिम येथील फूडीज मल्टिक्युझिन, जोगेश्वरी पश्चिम येथील अरेबियन लुक्मा, कुर्ला पश्चिम येथील झिड्स फूड अँड हॉस्पिटॅलिटी (दिल्ली जायका), घाटकोपर पश्चिम येथील आर सिटी मॉलमधील यू मी, गोवंडी-चेंबूर येथील बिक्कगने बिर्याणी एलएलपी तसेच भांडुप पश्चिम येथील ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडच्या डॉमिनोज पिझ्झा आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आली. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, या उद्देशाने प्रशासनाने ही मोहीम अधिक तीव्र केली असून नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.

एफडीएच्या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या. काही ठिकाणी स्वयंपाकघर आणि ड्रेनेज व्यवस्था अत्यंत अस्वच्छ असल्याचे, गंजलेले रॅक व भांडी वापरात असल्याचे, परत आलेला पाव ताज्या पावात मिसळला जात असल्याचे, अन्नसाठ्याच्या तापमानाची योग्य नोंद ठेवली जात नसल्याचे, कर्मचाऱ्यांकडे आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे तसेच मिठाईमध्ये अनधिकृत खाद्यरंगांचा वापर केल्याचे आढळले. या सर्व बाबी अन्नसुरक्षा व मानके नियम, २०११ मधील अनुसूची-४ च्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या असल्याने संबंधित आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. राज्यभर सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेत कोकण, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागातही कारवाई करण्यात आली असून एकूण ३७ हजार ९९१.४ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. या जप्त अन्नसाठ्याची अंदाजित किंमत ५४ लाख ६६ हजार रुपये असून अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा गैरप्रकारांबाबत नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा एफडीएच्या ऑनलाइन तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Previous Post

भिवंडीत दर बुधवारी १८ तासांची पाणीकपात; महापालिकेचा निर्णय

Next Post

ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलणार; चाचणीत ७५% गुण अनिवार्य!

Next Post
ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलणार; चाचणीत ७५% गुण अनिवार्य!

ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलणार; चाचणीत ७५% गुण अनिवार्य!

BreakingNews

बाल्कनीत कपडे वाळवण्यास बंदी आणि मोकळ्या भूखंडांना हिरवी जाळी बंधनकारक; पुणे पालिकेचा विचार

फटाका स्टॉलसाठी महापालिकेची परवानगी आणि ‘अग्निशामक NOC’ बंधनकारक!

ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलणार; चाचणीत ७५% गुण अनिवार्य!

एफडीएचा मोठा दणका! अस्वच्छता आणि नियमभंगामुळे मुंबईतील ९ खाद्य आस्थापनांवर टाळे

भिवंडीत दर बुधवारी १८ तासांची पाणीकपात; महापालिकेचा निर्णय

कोपरखैरणेतील पाणीटंचाई आणि कमी दाबाचा प्रश्न मिटणार; नव्या जलकुंभासाठी पालिकेचा विशेष पुढाकार!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.