Lokrakshanay
Thursday, September 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

सिगारेट ओढणाऱ्यांच्या खिशाला कात्री! ITC कडून लोकप्रिय ब्रँडच्या किमतीत वाढ

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 17, 2026
in ताज्या बातम्या
सिगारेट ओढणाऱ्यांच्या खिशाला कात्री! ITC कडून लोकप्रिय ब्रँडच्या किमतीत वाढ
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : धूम्रपान करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आता सिगारेट ओढणे केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर खिशालाही अधिक महाग ठरणार आहे. देशातील आघाडीची तंबाखू उत्पादक कंपनी ITC ने आपल्या काही लोकप्रिय सिगारेट ब्रँड्सच्या कमाल किरकोळ किमतीत (MRP) वाढ केली असून, नव्या दरांची पाकिटे बाजारात दाखल होऊ लागली आहेत. ‘क्लासिक कनेक्ट’ या २० सिगारेटच्या पाकिटाची किंमत ₹३९० वरून ₹४२८ करण्यात आली असून, त्यात सुमारे ९.७४ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच ‘गोल्ड फ्लेक सुपर स्टार’ या १० सिगारेटच्या पाकिटाची किंमत ₹७९ वरून ₹८९ करण्यात आली असून, त्यात जवळपास १२.६० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्यांना आता प्रत्येक पाकिटासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. नव्या एमआरपीची पाकिटे अनेक शहरांमध्ये उपलब्ध झाली असून, ज्या ठिकाणी जुन्या दरांचा साठा आहे तेथे तो संपल्यानंतर नवीन दर लागू होणार आहेत.

२०२६ या वर्षात ITC ने आपल्या सिगारेटच्या किमती अनेक वेळा वाढवल्या आहेत. फेब्रुवारीमध्ये ‘क्लासिक कनेक्ट’ची किंमत ₹३०० वरून ₹३६० आणि त्यानंतर ₹३९० करण्यात आली होती. आता ती थेट ₹४२८ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे ‘गोल्ड फ्लेक सुपर स्टार’ची किंमत ₹५९ वरून ₹७०, त्यानंतर ₹७९ आणि आता ₹८९ करण्यात आली आहे. या दरवाढीमागे केंद्र सरकारने १ फेब्रुवारी २०२६ पासून सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांवर लागू केलेली ४० टक्के जीएसटी आणि अतिरिक्त उत्पादन शुल्क हे प्रमुख कारण मानले जात आहे. वाढलेल्या करभाराचा परिणाम कमी करण्यासाठी कंपन्यांनी विविध श्रेणीतील उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. परिणामी, सिगारेटच्या दरात सातत्याने वाढ होत असून, त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या मासिक खर्चावर होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, वाढत्या किमतींमुळे काही जण धूम्रपानाचे प्रमाण कमी करू शकतात किंवा ते पूर्णपणे सोडण्याचा निर्णयही घेऊ शकतात.

Previous Post

‘Bappa.org’वर जतन होणार गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा; ठाणेकरांना जिल्हाधिकाऱ्यांचे सहभागी होण्याचे आवाहन

Next Post

लालबागमध्ये भाविकांना चोरट्यांचा फटका! सोन्याचे दागिने, मोबाईल चोरी; मध्य प्रदेशातील २ आरोपी अटकेत

BreakingNews

वांद्रे टर्मिनसवर गर्दीवर तोडगा! ३,७०० प्रवाशांसाठी सुरू होणार आधुनिक ‘होल्डिंग एरिया’

लालबागमध्ये भाविकांना चोरट्यांचा फटका! सोन्याचे दागिने, मोबाईल चोरी; मध्य प्रदेशातील २ आरोपी अटकेत

सिगारेट ओढणाऱ्यांच्या खिशाला कात्री! ITC कडून लोकप्रिय ब्रँडच्या किमतीत वाढ

‘Bappa.org’वर जतन होणार गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा; ठाणेकरांना जिल्हाधिकाऱ्यांचे सहभागी होण्याचे आवाहन

आता वाजणार संजू राठोडचं ‘पाहिजे’ गाणं; गणेशोत्सवाच्या धामधुमीत गाण्याने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष!

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या ब्रँडिंगसाठी व्यापक आराखडा तयार करावा – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.