Lokrakshanay
Thursday, September 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आता वाजणार संजू राठोडचं ‘पाहिजे’ गाणं; गणेशोत्सवाच्या धामधुमीत गाण्याने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 17, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
आता वाजणार संजू राठोडचं ‘पाहिजे’ गाणं; गणेशोत्सवाच्या धामधुमीत गाण्याने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : ‘गुलाबी साडी’, ‘लाल बांगडी’, ‘नऊवारी साडी’ आणि ‘शेकी’ यांसारख्या सुपरहिट गाण्यांमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला लोकप्रिय गायक, गीतकार आणि संगीतकार संजू राठोड पुन्हा एकदा नव्या गाण्यासह रसिकांच्या भेटीला आला आहे. गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात त्याने चाहत्यांना खास भेट देत आपले बहुप्रतिक्षित ‘पाहिजे’ हे नवे गाणे अधिकृतपणे युट्यूबवर प्रदर्शित केले आहे. गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला असून काही तासांतच हजारो लाईक्स, शेअर्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. ‘सोडूनी आज सारी लाज गं… राणी माझ्यासोबत नाच गं’ या आकर्षक ओळी तरुणाईच्या ओठांवर चढू लागल्या असून या गाण्याची जबरदस्त चर्चा सुरू आहे. संजू राठोडने यावेळीही आपली खास शैली कायम ठेवत आधुनिक संगीत, आकर्षक बीट्स आणि दमदार शब्दांची सांगड घालत चाहत्यांना आणखी एक डान्स ट्रॅक दिला आहे.

या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध गायिका जुईली जोगळेकर हिने संजू राठोडसोबत सुरेल आवाजाची साथ दिली असून, पार्श्वगायनासोबतच ती म्युझिक व्हिडिओमध्येही ग्लॅमरस आणि वेस्टर्न लूकमध्ये झळकली आहे. तर लोकप्रिय नृत्यांगना सौम्या कांबळे हिने संजू राठोडसोबत मुख्य भूमिकेत दमदार डान्स परफॉर्मन्स सादर केला असून दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना विशेष भावत आहे. गाण्याचे शब्द आणि गायन स्वतः संजू राठोड यांनी केले असून आधुनिक संगीत संयोजन जी-स्पार्क यांनी केले आहे. व्हिडिओ रिलीज होताच नेटकऱ्यांनी “संजू दादा पुन्हा एकदा हिट घेऊन आला”, “बंजारा व्हाइब्स भन्नाट आहेत”, “जुईलीचा अंदाज आणि सौम्याचा डान्स अप्रतिम” अशा प्रतिक्रिया देत गाण्याचे भरभरून कौतुक केले आहे. ‘गुलाबी साडी’नंतर आणखी एक चार्टबस्टर देण्यात संजू राठोड यशस्वी ठरल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली असून, ‘पाहिजे’ हे गाणे येत्या काही दिवसांत सोशल मीडिया आणि म्युझिक प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंगमध्ये झळकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या ब्रँडिंगसाठी व्यापक आराखडा तयार करावा – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

Next Post

‘Bappa.org’वर जतन होणार गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा; ठाणेकरांना जिल्हाधिकाऱ्यांचे सहभागी होण्याचे आवाहन

BreakingNews

वांद्रे टर्मिनसवर गर्दीवर तोडगा! ३,७०० प्रवाशांसाठी सुरू होणार आधुनिक ‘होल्डिंग एरिया’

लालबागमध्ये भाविकांना चोरट्यांचा फटका! सोन्याचे दागिने, मोबाईल चोरी; मध्य प्रदेशातील २ आरोपी अटकेत

सिगारेट ओढणाऱ्यांच्या खिशाला कात्री! ITC कडून लोकप्रिय ब्रँडच्या किमतीत वाढ

‘Bappa.org’वर जतन होणार गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा; ठाणेकरांना जिल्हाधिकाऱ्यांचे सहभागी होण्याचे आवाहन

आता वाजणार संजू राठोडचं ‘पाहिजे’ गाणं; गणेशोत्सवाच्या धामधुमीत गाण्याने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष!

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या ब्रँडिंगसाठी व्यापक आराखडा तयार करावा – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.