Lokrakshanay
Thursday, September 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या ब्रँडिंगसाठी व्यापक आराखडा तयार करावा – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 17, 2026
in ताज्या बातम्या, नाशिक, महाराष्ट्र
सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या ब्रँडिंगसाठी व्यापक आराखडा तयार करावा – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
Share on FacebookShare on Whatsapp

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकची धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक ओळख देशासह जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी व्यापक व प्रभावी आराखडा तयार करावा, असे निर्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिले. महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या उपस्थितीत नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या सभागृहात माध्यम आराखड्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, महासंचालकांचे विशेष कार्य अधिकारी इर्शाद बागवान, वृत्तचित्र विभागाचे वरिष्ठ सहायक संचालक सागरकुमार कांबळे आदी उपस्थित होते.

महासंचालक ब्रिजेश सिंह म्हणाले, नाशिक त्र्यंबकेश्वर येथे १२ वर्षानंतर कुंभमेळा भरत आहे. या कुंभमेळ्याचे जागतिक स्तरावर प्रभावी ब्रँडिंग करण्यासाठी पारंपरिक माध्यमांसोबतच डिजिटल माध्यमे, समाजमाध्यमे, दृक्-श्राव्य माध्यमे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध माध्यमांचा समन्वयित वापर करावा. त्यासाठी व्यापक आणि सर्वंकष असा आराखडा तयार करावा. या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याची वैशिष्ट्ये, धार्मिक परंपरा, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, गोदावरी नदी आणि प्रमुख तीर्थस्थळांची माहिती देश-विदेशातील भाविक व पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम राबविण्यात यावी. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक त्र्यंबकेश्वरची स्वतंत्र पर्यटन ओळख निर्माण करण्याबरोबरच अध्यात्मिक ठिकाणे, स्थानिक कला, संस्कृती, खाद्यपरंपरा, वारसा स्थळे आणि पर्यटनस्थळांचे प्रभावी सादरीकरण करण्यावरही भर द्यावा. त्यासाठी विविध माध्यमांसाठी स्वतंत्र आशय निर्मिती, साहित्य आणि सोशल मीडिया मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करावे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यात सुरू असलेल्या दीर्घकालीन विविध पायाभूत सोयीसुविधांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी. चुकीच्या बाबी, अफवांचे तातडीने खंडन करावे, अशाही सूचनाही त्यांनी दिल्या. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती दिली. बैठकीनंतर महासंचालक श्री. सिंह यांनी रामकुंड परिसराला भेट देत पाहणी केली. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने भाविकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा, प्रमुख स्थळांचे माध्यमीय सादरीकरण आणि प्रसिद्धीच्या दृष्टीने आवश्यक बाबींची त्यांनी माहिती घेतली. यावेळी पोलिस आयुक्त श्री. कर्णिक, संचालक डॉ. गांगुर्डे, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त श्री. रणदिवे,  उपसंचालक डॉ. मोघे, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

कोकणातील जादा बसेसमुळे जिल्ह्यांतर्गत बससेवा कोलमडली; गाड्या अर्धा तास उशिराने

Next Post

आता वाजणार संजू राठोडचं ‘पाहिजे’ गाणं; गणेशोत्सवाच्या धामधुमीत गाण्याने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष!

Next Post
आता वाजणार संजू राठोडचं ‘पाहिजे’ गाणं; गणेशोत्सवाच्या धामधुमीत गाण्याने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष!

आता वाजणार संजू राठोडचं ‘पाहिजे’ गाणं; गणेशोत्सवाच्या धामधुमीत गाण्याने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष!

BreakingNews

वांद्रे टर्मिनसवर गर्दीवर तोडगा! ३,७०० प्रवाशांसाठी सुरू होणार आधुनिक ‘होल्डिंग एरिया’

लालबागमध्ये भाविकांना चोरट्यांचा फटका! सोन्याचे दागिने, मोबाईल चोरी; मध्य प्रदेशातील २ आरोपी अटकेत

सिगारेट ओढणाऱ्यांच्या खिशाला कात्री! ITC कडून लोकप्रिय ब्रँडच्या किमतीत वाढ

‘Bappa.org’वर जतन होणार गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा; ठाणेकरांना जिल्हाधिकाऱ्यांचे सहभागी होण्याचे आवाहन

आता वाजणार संजू राठोडचं ‘पाहिजे’ गाणं; गणेशोत्सवाच्या धामधुमीत गाण्याने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष!

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या ब्रँडिंगसाठी व्यापक आराखडा तयार करावा – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.