Lokrakshanay
Friday, October 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘बिग बॉस २०’ चा धमाका; ‘तथास्तु’ थीम आणि नव्या नियमांसह ५० लाखांसाठी रंगणार महासंग्राम!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 7, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र, मुंबई
‘बिग बॉस २०’ चा धमाका; ‘तथास्तु’ थीम आणि नव्या नियमांसह ५० लाखांसाठी रंगणार महासंग्राम!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : सुपरस्टार सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन २०’ ६ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शोच्या नव्या पर्वाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असून, यंदाचा सीझन अनेक नव्या ट्विस्टसह रंगणार आहे. यावेळी शोची थीम ‘तथास्तु’ ठेवण्यात आली असून, स्पर्धकांना ‘अतिरिक्त जीवनदान’ (Extra Lifeline) मिळणार आहे. एलिमिनेशनच्या धोक्यात आलेल्या स्पर्धकांना घरातील सदस्य किंवा प्रेक्षकांच्या मदतीने आणखी एक संधी मिळू शकते. या संकल्पनेमुळे खेळ अधिक अनपेक्षित आणि रोमांचक होण्याची शक्यता आहे. तसेच घरातील सदस्यांना दोन संघांमध्ये विभागले जाणार असून, कर्णधारपद दर आठवड्याला बदलणार आहे. यामुळे प्रत्येक आठवड्यात नवी रणनीती आणि नवे समीकरण पाहायला मिळणार आहे.

‘बिग बॉस’चे घरही यंदा पूर्णपणे वेगळ्या स्वरूपात सजवण्यात आले आहे. डिझायनर कांचन आणि रूपाली यांनी ‘फँटसी-अॅडव्हेंचर’ थीमवर आधारित घराची रचना केली असून, संपूर्ण घराला जंगलाचा आकर्षक लूक देण्यात आला आहे. विविध प्राण्यांच्या मूर्ती, गोरिलाची भव्य प्रतिमा, सापांच्या डिझाइनने सजलेला गार्डन एरिया आणि खास थीम असलेल्या बेडरूम्समुळे घराचे सौंदर्य अधिक खुलले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही घराची सजावट प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरणार आहे. स्पर्धकांची अधिकृत यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी काही चर्चित नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. रॅपर बादशाहची माजी पत्नी ईशा रिखी, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांची पत्नी व अभिनेत्री गीता बसरा, गायक काझी तौकीर, शोविक चक्रवर्ती, अभिनेता अमन गांधी, ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर मेरी कोम, खुशी दुबे, आम्रपाली दुबे, कनिका मान, कुशल तंवर, लव गिल, माही विज, यंग डीएसए, रिया अहिर आणि उदिती सिंग यांसारखी नावे संभाव्य स्पर्धक म्हणून चर्चेत आहेत. अंतिम यादी आणि सर्व चेहरे ग्रँड प्रीमियरमध्येच उघड केले जाणार आहेत. यंदाच्या विजेत्याला ट्रॉफीसह ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘तथास्तु’ थीममुळे खेळाचे नियमही बदलले असून, केवळ मतांवर नव्हे तर टास्कमधील कामगिरीवरही स्पर्धकांचे भवितव्य ठरणार आहे. टास्क यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांनाच अतिरिक्त जीवनदानाचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे प्रत्येक टास्क अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, ‘बिग बॉस 16’चा विजेता एमसी स्टॅन ग्रँड प्रीमियरमध्ये दमदार रॅप परफॉर्मन्स सादर करणार असून, त्याच्या सादरीकरणाचीही चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. नवी थीम, वेगळे नियम, आकर्षक घर, चर्चित स्पर्धक आणि सलमान खानची दमदार उपस्थिती यामुळे ‘बिग बॉस सीझन २०’ हा आतापर्यंतच्या सर्वाधिक चर्चेतील आणि मनोरंजक पर्वांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

शिक्षक संपूर्ण पिढी घडवण्याचे कार्य करतात; डॉ. रेवती श्रीनिवासन यांचे कार्य ठाण्यासाठी अभिमानास्पद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

Instagram वरही मुंढेंची क्रेझ; फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंना टाकले मागे!

Next Post
Instagram वरही मुंढेंची क्रेझ; फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंना टाकले मागे!

Instagram वरही मुंढेंची क्रेझ; फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंना टाकले मागे!

BreakingNews

एफडीएचा मोठा दणका! अस्वच्छता आणि नियमभंगामुळे मुंबईतील ९ खाद्य आस्थापनांवर टाळे

भिवंडीत दर बुधवारी १८ तासांची पाणीकपात; महापालिकेचा निर्णय

कोपरखैरणेतील पाणीटंचाई आणि कमी दाबाचा प्रश्न मिटणार; नव्या जलकुंभासाठी पालिकेचा विशेष पुढाकार!

‘फुलवंती’नंतर प्राजक्ता माळीची नवी निर्मिती; ‘गौरी’तून उलगडणार स्त्रीसंघर्षाची कथा

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! एल निनोच्या धोक्यामुळे पाणीकपात; महापालिकेकडून १० महिन्यांचा मास्टरप्लॅन जाहीर

ठाण्यात प्रीपेड रिक्षा सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद; जनजागृतीअभावी दिवसाला केवळ ८ ते १० प्रवासी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.