Lokrakshanay
Saturday, August 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ताशी १६० किमीच्या वेगाने पश्चिम रेल्वेवर वंदे भारत धावणार

मुंबई आणि अहमदाबाददरम्यानचा प्रवासाचा वेळ कमीत कमी ३० ते ५० मिनिटांनी कमी करण्याचा प्रयत्न आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 27, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
ताशी १६० किमीच्या वेगाने पश्चिम रेल्वेवर वंदे भारत धावणार
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस पश्चिम रेल्वेवरील मिशन रफ्तार प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार असून मिशन रफ्तारअंतर्गत मुंबई – सुरत – वडोदरा – दिल्ली आणि मुंबई – वडोदरा – अहमदाबाद या महत्त्वाच्या विभागांमध्ये रेल्वेगाड्या ताशी १६० किमी वेगाने धावणार आहेत. त्यामुळे लवकरच पश्चिम रेल्वेवरील पहिली मुंबई सेंट्रल – गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस ताशी १६० किमी वेगाने धावण्यास सज्ज होणार आहे. मुंबई आणि अहमदाबाददरम्यानचा प्रवासाचा वेळ कमीत कमी ३० ते ५० मिनिटांनी कमी करण्याचा प्रयत्न आहे. तसेच मुंबई – दिल्ली दरम्यानच्या प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे. भारतीय रेल्वेच्या प्रत्येक विभागात रेल्वेगाड्या ताशी १३० किमी वेगाने धावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र पश्चिम रेल्वेने एक पाऊल पुढे टाकत रेल्वेगाड्याचा वेग ताशी १६० किमीने वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पश्चिम रेल्वेच्या रुळाच्या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंत उभारणे किंवा लोखंडी तारा लावणे सुरू आहे. यामुळे रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घटना, गुरे रेल्वे मार्गावर येण्याच्या घटना रोखता येतील. मुंबई – अहमदाबाद या ६२२ किमी रेल्वे मार्गापैकी ५६२ किमी रेल्वे मार्गावर कुंपण उभारण्यात आले आहे. उर्वरित रेल्वे मार्गावर कुंपण उभारण्याचे काम लवकरच पूर्ण होईल. या कामासाठी एकूण २६४ कोटी रुपये खर्च आला आहे. तसेच रेल्वे रूळांचे मजबूतीकरण, ओव्हर हेड वायर आणि सिग्नलिंग यंत्रणा सक्षम करण्यात येत आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

‘मिशन रफ्तार’ प्रकल्पासाठी अंदाजे ३,९५९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र यामुळे वंदे भारत, तेजस आणि शताब्दी एक्स्प्रेससारख्या रेल्वेगाड्यांचा प्रवास वेगवान होईल. मुंबई – दिल्ली रेल्वे मार्गाच्या एकूण १,३७९ किमीपैकी ५० टक्के भाग पश्चिम रेल्वेअंतर्गत येतो. साधारणपणे मुंबई सेंट्रल – नागदापर्यंत (६९४ किमी) उर्वरित भाग पश्चिम मध्य रेल्वे आणि उत्तर रेल्वेमध्ये विभागला आहे. इतर विभागीय रेल्वे देखील मार्च २०२४ अखेर ‘मिशन रफ्तार’ प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रमुख अभियांत्रिकी सुधारणांमध्ये जिओ सेलचा वापर करून पुलाचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत १२६ पुलांच्या मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

Previous Post

शाळकरी मुले नशेच्या विळख्यात; विद्यार्थ्यांच्या दप्तरांत नशेच्या गोळ्या, ड्रग्ज तस्करांकडून विद्यार्थीनींची छेडछाड

Next Post

भिवंडी पोलिसांच्या कारवाईत उघड; मुंबई महानगरात बनावट जिऱ्याची विक्री, दोन जणांना अटक

Next Post
भिवंडी पोलिसांच्या कारवाईत उघड; मुंबई महानगरात बनावट जिऱ्याची विक्री, दोन जणांना अटक

भिवंडी पोलिसांच्या कारवाईत उघड; मुंबई महानगरात बनावट जिऱ्याची विक्री, दोन जणांना अटक

BreakingNews

शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात प्रशासनाची कडक पावले; ७० जणांवर कारवाई!

गुटख्याचे पाऊच होणार इतिहासजमा; आता छोट्या डब्यातच मिळणार पान मसाला – केंद्र सरकारचा निर्णय

डी-मार्टमधून १४,९४९ रुपयांचे किराणा सामान चोरण्याचा प्रयत्न; ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

१ सप्टेंबरपासून एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य!

२०२९ पर्यंत सगळ्या लोकल मेट्रोसारख्या वातानुकूलित होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

खतांसाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही; ठाण्यात १५ ऑगस्टपासून ‘ऑनलाइन बुकिंग’ सुविधा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.