Lokrakshanay
Friday, June 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

१ जुलैपासून पासपोर्ट महागणार; १४ वर्षांनंतर शुल्कात मोठी वाढ!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 26, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश
१ जुलैपासून पासपोर्ट महागणार; १४ वर्षांनंतर शुल्कात मोठी वाढ!
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : परदेश प्रवासाची तयारी करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने तब्बल १४ वर्षांनंतर पासपोर्टच्या शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, १ जुलैपासून नवीन पासपोर्ट काढणे तसेच विद्यमान पासपोर्टचे नूतनीकरण करणे अधिक खर्चिक ठरणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट नियम २०२६ अंतर्गत सुधारित शुल्क रचना जाहीर केली असून, १ जुलै किंवा त्यानंतर सादर करण्यात येणाऱ्या सर्व अर्जांसाठी हे नवीन दर लागू असतील. विशेष म्हणजे, पासपोर्ट हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नसून तो केवळ परदेश प्रवासासाठीचा अधिकृत दस्तऐवज असल्याचे सरकारने स्पष्ट केल्यानंतर लगेचच ही सुधारित शुल्क रचना जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी २०१२ मध्ये सामान्य पासपोर्टचे शुल्क एक हजार रुपयांवरून दीड हजार रुपये करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या पासपोर्टच्या शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार १८ वर्षांवरील नागरिकांसाठी ३६ पानांच्या नवीन किंवा नूतनीकरण केलेल्या पासपोर्टचे शुल्क सामान्य प्रक्रियेत १,५०० रुपयांवरून २,५०० रुपये करण्यात आले आहे, तर तातडीच्या प्रक्रियेत हे शुल्क ३,५०० रुपयांवरून ५,००० रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे ६० पानांच्या पासपोर्टसाठी सामान्य प्रक्रियेत २,००० रुपयांऐवजी ३,५०० रुपये, तर तातडीच्या प्रक्रियेत ४,००० रुपयांऐवजी ६,००० रुपये आकारले जाणार आहेत. पासपोर्ट हरवल्यास किंवा खराब झाल्यास नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठीही मोठा खर्च करावा लागणार आहे. ३६ पानांच्या पासपोर्टसाठी सामान्य प्रक्रियेत ५,००० रुपये आणि तातडीच्या प्रक्रियेत ७,५०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तर ६० पानांच्या पासपोर्टसाठी अनुक्रमे ६,००० आणि ८,५०० रुपये मोजावे लागतील.

अल्पवयीन मुलांच्या पासपोर्ट शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. १८ वर्षांखालील मुलांसाठी ३६ पानांच्या नवीन किंवा नूतनीकरण केलेल्या पासपोर्टसाठी सामान्य प्रक्रियेत १,७५० रुपये आणि तातडीच्या प्रक्रियेत ४,२५० रुपये शुल्क आकारले जाईल. मुलांचा पासपोर्ट हरवल्यास सामान्य प्रक्रियेत ४,२५० रुपये, तर तातडीच्या प्रक्रियेत ६,७५० रुपये शुल्क भरावे लागेल. याशिवाय परराष्ट्र मंत्रालयाने इतर महत्त्वाच्या सेवांच्या शुल्कातही बदल केला आहे. पोलीस पडताळणी प्रमाणपत्र, पासपोर्ट परतावा प्रमाणपत्र आणि जागतिक प्रवेश कार्यक्रम पडताळणीसाठी भारतात ७५० रुपये, तर परदेशात ४० अमेरिकन डॉलर शुल्क आकारले जाईल. ओळख प्रमाणपत्रासाठी भारतात १,००० रुपये आणि परदेशात ५० अमेरिकन डॉलर शुल्क निश्चित करण्यात आले आहे. आणीबाणीच्या प्रवासासाठी दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रासाठी भारतात कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, मात्र परदेशात त्यासाठी १५ अमेरिकन डॉलर मोजावे लागतील. या सुधारित शुल्क रचनेमुळे परदेश प्रवासाचे नियोजन करणाऱ्या नागरिकांच्या खर्चात वाढ होणार असून, १ जुलैपासून सादर होणाऱ्या सर्व नवीन पासपोर्ट अर्जांवर हेच नवीन दर लागू राहतील.

Previous Post

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण मोठ्या पडद्यावर; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा!

BreakingNews

१ जुलैपासून पासपोर्ट महागणार; १४ वर्षांनंतर शुल्कात मोठी वाढ!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण मोठ्या पडद्यावर; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा!

मलंगगडाचा कायापालट! ३५०० पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी

महिला सुरक्षेसाठी ‘खाकीतील सखी’ उपक्रमाला बळ; ठाणे स्थानकात जनजागृती मोहीम!

खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी ‘सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश’; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतासमोर आज ‘करा किंवा मरा’चा सामना!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.