Lokrakshanay
Monday, May 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाणे जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार रोखण्यासाठी उभारणार चेकनाके

कृषी विभाग आणि पोलिसांची संयुक्त मोहीम; अवैध साठेबाजी व वाहतुकीवर कठोर कारवाईचा इशारा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 18, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
ठाणे जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार रोखण्यासाठी उभारणार चेकनाके
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार, अवैध साठेबाजी आणि बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्याच्या सीमेलगतच्या प्रमुख मार्गांवर विशेष चेकनाके उभारण्यात येणार असून, संशयित वाहनांची तपासणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि योग्य दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृषी उपयोगासाठी असलेले निमकोटेड युरिया खत औद्योगिक वापरासाठी वळवले जाणार नाही, यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत.  काही ठिकाणी युरिया खताची अवैध साठेबाजी, परराज्यात किंवा इतर जिल्ह्यांत बेकायदेशीर वाहतूक, जादा दराने विक्री आणि अनधिकृत वितरण होत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या खरीप हंगामासाठी पुरेसा खतसाठा उपलब्ध असला तरी कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार करण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी प्रशासन विशेष दक्षता घेत आहे. या विशेष कारवाईदरम्यान कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी संयुक्तपणे वाहनांची तपासणी करणार आहेत.

युरिया खत वाहतूक करणाऱ्या वाहनांची कागदपत्रे, परवाने, बिले आणि साठ्याची पडताळणी केली जाणार असून, कोणत्याही वाहनात मोठ्या प्रमाणात युरिया खत आढळल्यास त्याची सखोल चौकशी करण्यात येईल. नियमभंग किंवा अनियमितता आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. कृषी विकास अधिकारी मुनीर बचोटिकर यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना वेळेत आणि योग्य दरात खत उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. युरिया खताचा काळाबाजार, अवैध वाहतूक किंवा साठेबाजी करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही.” प्रशासनाने शेतकऱ्यांना अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खत खरेदी करण्याचे आवाहन केले असून, जादा दराने विक्री किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ची राज्यस्तरीय घोषणा; पहिला पुरस्कार अजित पवारांच्या नावाने!

BreakingNews

ठाणे जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार रोखण्यासाठी उभारणार चेकनाके

‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ची राज्यस्तरीय घोषणा; पहिला पुरस्कार अजित पवारांच्या नावाने!

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.