Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 29, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अन्वये २८ एप्रिल हा दिवस ‘सेवा हक्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत अंजूर व ग्रामपंचायत सोनाळे तसेच शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत चेरपोली या ग्रामपंचायतींचा समावेश असून, संबंधित सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व केंद्रचालक यांना सन्मानित करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत अधिकारी हिरामण खाडे यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, शशिकांत गायकवाड, वरुणकुमार सहारे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, प्रांताधिकारी अमित सानप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, तहसीलदार सचिन चौधरी, संदीप थोरात तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी “आपली सेवा, आमचे कर्तव्य” ही शपथ घेत नागरिकांना वेळेत, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देत नागरिककेंद्री प्रशासन उभारण्यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक संवेदनशीलतेने कार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. तसेच ‘आदर्श आपले सरकार सेवा केंद्र’ सारख्या उपक्रमांमुळे नागरिकांना सुलभ व जलद सेवा उपलब्ध होत असल्याचे नमूद करण्यात आले. ‘सेवा हक्क दिना’च्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करण्यात आली असून, पुढील काळातही सेवा वितरणात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमामुळे सेवा हक्क अधिनियमाबाबत जनजागृती होऊन प्रशासन व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Previous Post

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Next Post

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

Next Post
ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

BreakingNews

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.