Lokrakshanay
Sunday, April 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

अधिकाऱ्यासह तीनजण दीड लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी ताब्यात

विना परवाना बांधकामाचा मालमत्ता क्रमांक कायम करण्यासाठी मागितली लाच

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 4, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
अधिकाऱ्यासह तीनजण दीड लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी ताब्यात
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : भिवंडी महापालिकेचे कर विभागाचे प्रमुख सुदाम जाधव यांच्यासह तिघांना दीड लाख रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. विना परवाना बांधकामाचा मालमत्ता क्रमांक कायम करू देण्यासाठी त्यांनी लाच मागितल्याचे समोर आले आहे. सुदाम जाधव यांनी म्हैस आणि रेड्याच्या चरबीपासून बनावट तूप बनविण्याचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर लाचेची कारवाई झाल्याने खळबळ उडाली. सुदाम जाधव (५४), लिपीक किशोर केणे (५१) आणि लिपीक सायराबानो अन्सारी (५२) अशी ताब्यात असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे १३ हजार ८०० चौ.फूटांचे बांधकाम आहे. हे बांधकाम विना परवाना असून बांधकामांचा मालमत्ता क्रमांक कायम करण्यासाठी, जुनी करण आकारणी रद्द करून नव्याने सुधारित कर आकारणी लागू करण्यासाठी सुदाम जाधव, किशोर केणे आणि सायराबानो अन्सारी यांनी त्यांच्याकडून प्रति चौ. फूटांचे १५ रुपये प्रमाणे २ लाख ७ हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकारानंतर तक्रारदारांनी याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी याप्रकरणाची पडताळणी केली असता, त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती १ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले. सुदाम जाधव आणि सायराबानो यांनी लाचेची रक्कम किशोर केणे यांना घेण्यास सांगितल्याचेही निष्पन्न झाले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेच्या ६ व्या मजल्यावर केणे याला दीड लाख रुपयांची लाच घेताना हातोहात पकडले. त्यानंतर सुदाम आणि सायराबानो यांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. म्हैस आणि रेड्याच्या चरबीपासून बनावट तूप तयार करण्याचा प्रकार भिवंडीत उघडकीस आला होता. ही कारवाई सुदाम जाधव यांच्या पथकाने केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुदाम जाधव यांच्यावर कारवाई झाल्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे.

Previous Post

बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये रोजगाराची संधी – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

Next Post

‘शून्य औषध चिठ्ठी योजने’साठी पालिका रुग्णालयात एक हजार कोटींची तरतूद!

Next Post
बांधकामे रोखण्याचा आयुक्तांचा इशारा, उद्योग व व्यवसायांसाठी सूचना; बांधकामांबाबत पालिकेच्या सूचना

‘शून्य औषध चिठ्ठी योजने’साठी पालिका रुग्णालयात एक हजार कोटींची तरतूद!

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.