Lokrakshanay
Friday, June 5, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये रोजगाराची संधी – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 3, 2024
in Uncategorized, ठाणे, ताज्या बातम्या
बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये रोजगाराची संधी – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : इस्राईलमध्ये रोजगाराच्या संधींसाठी कुशल बांधकाम कामगारांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून सुरू झाली आहे. इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मंत्री श्री.लोढा म्हणाले की, केंद्र सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट इंटरनॅशनल आणि राज्य शासनाच्या सहकार्याने बांधकाम कामगारांसाठी इस्राईलमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. शासनाकडून सर्वोतोपरी या बांधकाम कामगारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हा कौशल्य, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे इच्छुकांनी संपर्क साधावा.

फ्रेमवर्क/ शटरिंग कारपेंटर, बार बेंडिंग मेसन, सिरेमिक टाइलिंग मेसन, प्लास्टरिंग मेसन इत्यादी विविध ट्रेडसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. निवडलेल्या व्यक्तीना इस्राईलमधील इमारत बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. या नोकरीमुळे प्रत्येक कामगाराला १.४ लाख रुपयांपासून ते २ लाखांपर्यंत दरमहा वेतन मिळेल. दरमहा १६,००० रुपये अतिरिक्त ठेव निधी ठेवावा लागेल. या पदासाठी साठी २५ ते ४५ वर्षे वयोगटातील अर्जदार नोकरीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराने  किमान १० वी उत्तीर्ण केलेली असावी. कामगाराला किमान एक वर्ष ते कमाल पाच वर्षांच्या नोकरीसाठी अनिवार्य करारावर स्वाक्षरी करावी लागेल. तसेच त्यांना कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. त्याचप्रमाणे इस्राईलमध्ये पूर्वीचा रोजगाराचा इतिहास नसावा. अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी इस्राईलमध्ये काम केलेले नसावे. अधिक माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/mic या संकेतस्थळावर भेट द्यावी आणि ८२९१६६२९२० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

अकरा लाखाची कल्याणमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरूणाची फसवणूक

Next Post

अधिकाऱ्यासह तीनजण दीड लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी ताब्यात

Next Post
अधिकाऱ्यासह तीनजण दीड लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी ताब्यात

अधिकाऱ्यासह तीनजण दीड लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी ताब्यात

BreakingNews

ई-बस चालकांसाठी चार आठवड्यांचे प्रशिक्षण बंधनकारक! – बेस्टचा मोठा निर्णय

नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांना विलंब; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तक देण्यासाठी बालभारतीची धावपळ

ठाणे जिल्हा प्रशासनाची संवेदनशील धाव! टंचाईग्रस्त १२७ पाड्यांना ४० टँकर्सद्वारे पाण्याचा दिलासा

६२ लाख ‘लाडक्या बहिणींची’ ई-केवायसी बाकी; अर्जांची पुन्हा पडताळणी होणार – मंत्री अदिती तटकरांचे आश्वासन

ठाण्यात FDA ची मोठी कारवाई; ११ लाखांचे आंबे जप्त, ३७ जणांना अटक

गोव्यातील मंगेशीत उभारले जाणार लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे भव्य स्मारक

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.