Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 14, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : येत्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन पासून राज्यातील परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मोटार परिवहन विभागाकडून राज्यभरातील ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान चालकांना मराठी भाषा वाचता आणि लिहिता येते का, याची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकांविरोधात कठोर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. या निर्णयामुळे स्थानिक भाषेचा सन्मान राखण्याबरोबरच प्रवाशांशी संवाद सुलभ होण्यास मदत होणार असल्याचेही सांगण्यात आले.

मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, रिक्षा व टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे हा नियम पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. मात्र मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये अनेक चालकांना मराठीत संवाद साधता येत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. काही चालक जाणूनबुजून मराठी बोलण्याचे टाळतात, असेही निदर्शनास आले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, ज्या राज्यात आपण व्यवसाय करतो त्या राज्याची भाषा शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि त्या भाषेचा आदर राखणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे १ मेपासून सर्व चालकांसाठी मराठी वाचणे आणि लिहिणे अनिवार्य राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या संबंधित परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Next Post

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

Next Post
ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

BreakingNews

पावसाच्या कमतरतेचा फटका; किरकोळ बाजारात एक लिंबू १० रुपयांना!

१ ऑक्टोबर उजाडला आणि नियम बदलला! आता मालमत्तेच्या व्यवहारासाठी ‘हे’ कार्ड बंधनकारक; सरकारने काय आदेश दिला?

अर्थमंत्र्यांच्या ‘त्या’ आश्वासनाने व्यापाऱ्यांचा युटर्न; २ ऑक्टोबरचा ‘नो UPI डे’ रद्द!

शुभमन गिलचा विश्वविक्रमांचा धडाका! २२३ धावांच्या वादळी खेळीने भारताचा विक्रमी विजय

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.