Lokrakshanay
Thursday, July 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

घरोघरी पोहोचलेला Doraemon पोरका! दिग्दर्शक त्सुतोमु शिबायमा यांचे ८९ व्या वर्षी निधन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 20, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
घरोघरी पोहोचलेला Doraemon पोरका! दिग्दर्शक त्सुतोमु शिबायमा यांचे ८९ व्या वर्षी निधन
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : ९० चे दशक असो वा २००० नंतरचा काळ, ज्या कार्टून मालिकेने जगभरातील कोट्यवधी लहान मुलांचे मनोरंजन केले आणि आजही अनेक तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे, त्या ‘डोरेमॉन’ (Doraemon) या अजरामर मालिकेचे शिल्पकार आणि दिग्गज दिग्दर्शक त्सुतोमु शिबायमा यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने अ‍ॅनिमेशन विश्वातील एक सुवर्णयुग मावळले असून, ‘डोरेमॉन’ चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

त्सुतोमु शिबायमा यांनी जवळपास २० वर्षांहून अधिक काळ ‘डोरेमॉन’ या जगप्रसिद्ध मालिकेचे आणि त्यातील पात्रांचे दिग्दर्शन केले. नोबिता, डोरेमॉन, शिजुका, जियान आणि सुनियो या पात्रांना पडद्यावर जिवंत करण्यात आणि त्यांच्या कथांना मानवी भावनांची जोड देण्यात शिबायमा यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या कल्पक दिग्दर्शनामुळेच हे कार्टून केवळ लहान मुलांचे मनोरंजन न राहता, प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांचे आवडते पात्र बनले. केवळ टीव्ही मालिकाच नव्हे, तर ‘डोरेमॉन’ फ्रँचायझीचे अनेक उत्कृष्ट आणि गाजलेले चित्रपट त्सुतोमु शिबायमा यांनी प्रेक्षकांसमोर आणले. त्यांच्या कार्यकाळात डोरेमॉनच्या चित्रपटांनी नवनवीन उंची गाठली. अंतराळ प्रवास असो, डायनासोरचे युग असो वा समुद्राच्या तळाशी असलेले रहस्यमय जग, शिबायमा यांनी आपल्या दिग्दर्शनातून मुलांना एका काल्पनिक पण वास्तववादी विश्वाची सफर घडवून आणली. त्यांच्या चित्रपटांमधील कथा केवळ मनोरंजक नसून, त्यातून मैत्री आणि धाडसाचे मूल्यही शिकवले जात असे. त्सुतोमु शिबायमा यांच्या निधनामुळे अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील एका महान मार्गदर्शकाची उणीव भासणार आहे. भारतातही डोरेमॉनने मुलांच्या मनात घर केले आहे. आज अनेक मुले मोठी झाली असली, तरी आजही फावल्या वेळात डोरेमॉन बघणे त्यांना तितकेच आनंददायी वाटते. शिबायमा यांनी निर्माण केलेली ही कलाकृती पिढ्यानपिढ्या जिवंत राहणार आहे. त्सुतोमु शिबायमा यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे केवळ जपानमध्येच नव्हे, तर जगभरातील अ‍ॅनिमेशन प्रेमी आणि ‘डोरेमॉन’च्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

 

Previous Post

उबर आणि मेट्रोची हातमिळवणी; Uber ॲपवरून एका क्लिकवर मिळणार तिकीट

Next Post

आता ATM मधून मिळणार गॅस! रिकामं सिलेंडर द्या आणि ३ मिनिटांत भरलेलं न्या

Next Post
आता ATM मधून मिळणार गॅस! रिकामं सिलेंडर द्या आणि ३ मिनिटांत भरलेलं न्या

आता ATM मधून मिळणार गॅस! रिकामं सिलेंडर द्या आणि ३ मिनिटांत भरलेलं न्या

BreakingNews

कोपरी-पाचपाखाडीत मतदार पुनरिक्षण मोहिमेला वेग; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘Enumeration Form’चे वाटप

मुंबईत नवा सागरी मार्ग उभारणार; वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १.८७ किमीचा प्रकल्प!

ठाण्यात FDAची मोठी कारवाई; गुजरातमधून आणला जाणारा २ ते ३ टन संशयित भेसळयुक्त मावा जप्त!

विसर्जित पीओपी गणेशमूर्तींपासून ७६० अभ्यास टेबल; नवी मुंबई महापालिकेचा पर्यावरणपूरक उपक्रम!

ज्येष्ठ रंगदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन; मराठी रंगभूमीतील सुवर्णपर्वाचा अस्त!

१८ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.