Lokrakshanay
Sunday, April 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

यंदा ५वी आणि ८वी या इयत्तांसह चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठीही शिष्यवृत्ती परीक्षा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 21, 2026
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
यंदा ५वी आणि ८वी या इयत्तांसह चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठीही शिष्यवृत्ती परीक्षा
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : राज्य परीक्षा परिषदेतर्फे यंदा पाचवी आणि आठवी या इयत्तांसह चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठीही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अनेक शाळांनी नोंदणी केलेली नाही, विद्यार्थ्यांचे अर्जही भरले नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आढावा बैठकीमध्ये चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठीच्या विद्यार्थी संख्येबाबत शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर, राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी शाळांना नोंदणी वाढविण्याच्या सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यात म्हटले आहे, ‘प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (चौथी), उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (सातवी) या परीक्षांसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी जिल्हा स्तरावरून विशेष प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे.’ ‘परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या अर्जांचा आढावा घेतला असता, अनेक जिल्ह्यांमध्ये स्थिती उदासीन असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. सरल संकेतस्थळानुसार नोंद असलेल्या शाळांपैकी अनेक शाळांनी सदर परीक्षेकरिता नोंदणी केलेली नाही किंवा विद्यार्थी आवेदनपत्रही भरलेले नाही. त्यामुळे शाळा नोंदणी, विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याबाबत शाळांचे उद्बोधन होणे आवश्यक आहे. आढावा बैठकीमध्ये चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठीच्या विद्यार्थिसंख्येबाबत शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासन धोरणाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद, महापालिकांच्या शाळांतील १०० टक्के विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्याबाबतच्या लेखी सूचना द्याव्यात,’ असेही परिपत्रकात नमूद केले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये २६ एप्रिल रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबर ते १३ फेब्रुवारी या कालावधीत विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठीची मुदत देण्यात आली होती. तसेच नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत परीक्षा परिषदेने मुदतवाढ दिली आहे.

Previous Post

केईएम रुग्णालयात आता सरकारी दरात आयव्हीएफ उपचार सुरू

Next Post

सावधान! २३ फेब्रुवारीला पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीपुरवठा बंद

Next Post
सावधान! २३ फेब्रुवारीला पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीपुरवठा बंद

सावधान! २३ फेब्रुवारीला पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीपुरवठा बंद

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.