Lokrakshanay
Saturday, July 4, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

भारतात व्हॉट्सॲप बंद होणार? डेडलाईन जाहीर

Privacy मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाचा व्हॉट्सॲपला कडक इशारा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 4, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश, राष्ट्रीय
भारतात व्हॉट्सॲप बंद होणार? डेडलाईन जाहीर
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : भारतात व्हॉट्सॲप हे केवळ एक मेसेजिंग ॲप नसून ते दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. मात्र, याच व्हॉट्सॲपच्या मालकीच्या ‘मेटा’ (Meta) कंपनीला सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा दिला आहे. “जर तुम्ही आमचे संविधान पाळू शकत नसाल, तर खुशाल भारत सोडून जा,” अशा कडक शब्दांत सरन्यायाधीशांनी कंपनीला फटकारले आहे. वापरकर्त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकारावरून न्यायालयाने हे कठोर पाऊल उचलले आहे.

व्हॉट्सॲपच्या २०२१च्या प्रायव्हसी पॉलिसी अपडेटपासून या वादाला सुरुवात झाली. या धोरणानुसार, व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांची माहिती फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या मेटाच्या इतर कंपन्यांसोबत शेअर करू शकते. वापरकर्त्यांना ही पॉलिसी स्वीकारणे किंवा खाते कायमचे बंद करणे असे दोनच पर्याय देण्यात आले होते. माहिती शेअर न करता ॲप वापरण्याचा कोणताही पर्याय (Opt-out) न दिल्याने याला ‘सक्तीची संमती’ म्हटले जात आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) या धोरणाविरोधात मेटा कंपनीला २१३.१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. याविरोधात मेटाने केलेल्या अपिलावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने अतिशय आक्रमक भूमिका घेतली.

१. माहितीची चोरी : सरन्यायाधीशांनी म्हटले की, वापरकर्त्यांना पर्याय न देणे ही खासगी माहिती चोरण्याची एक पद्धत आहे.

२. सक्तीची संमती : न्यायालयाने याला ‘मॅन्युफॅक्चर्ड कन्सेंट’ असे संबोधले. व्हॉट्सॲपची मक्तेदारी असल्याने लोक नाईलाजास्तव या अटी मान्य करत आहेत, असे ताशेरे ओढले गेले.

३. गोपनीयतेचा अधिकार : “आम्ही वापरकर्त्यांची एकही माहिती शेअर करू देणार नाही. या देशात गोपनीयतेच्या अधिकाराशी खेळ खपवून घेतला जाणार नाही,” असे न्यायालयाने ठणकावून सांगितले.

कंपनीच्या वतीने युक्तिवाद करताना सांगण्यात आले की, व्हॉट्सॲप सेवा मोफत आहे आणि आम्ही वापरकर्त्यांकडून कोणतेही शुल्क घेत नाही. तसेच, सर्व वैयक्तिक चॅट्स पूर्णपणे सुरक्षित (Encrypted) असून केवळ मर्यादित माहितीच व्यावसायिक हेतूंसाठी वापरली जाते, असा दावा कंपनीने केला आहे. मात्र, न्यायालयाला हा युक्तिवाद पटलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने आता चेंडू मेटाच्या कोर्टात टाकला आहे. कंपनीने ९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करून अशी खात्री द्यावी की, ते कोणत्याही भारतीय वापरकर्त्याची माहिती इतर कंपन्यांसोबत शेअर करणार नाहीत. जर ही खात्री दिली नाही, तर कंपनीच्या अपिलावर विपरीत परिणाम होऊ शकतो. व्हॉट्सॲप भारत सोडून जाण्याची शक्यता तूर्तास कमी असली, तरी भारताच्या कायद्यानुसार त्यांना आपल्या धोरणांत बदल करावाच लागेल, असे संकेत मिळत आहेत.

 

Previous Post

मल्याळम चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा! प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एसपी वेंकटेश यांच निधन

Next Post

जागतिक कर्करोग दिन : जागरूकता, प्रतिबंध आणि वेळेवर उपचार हेच कर्करोगावरचे प्रभावी शस्त्र

Next Post
जागतिक कर्करोग दिन : जागरूकता, प्रतिबंध आणि वेळेवर उपचार हेच कर्करोगावरचे प्रभावी शस्त्र

जागतिक कर्करोग दिन : जागरूकता, प्रतिबंध आणि वेळेवर उपचार हेच कर्करोगावरचे प्रभावी शस्त्र

BreakingNews

साकीनाका मॅनहोल दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबाला १० लाखांची मदत; दोषींवर कठोर कारवाईचा महापौरांचा इशारा!

शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे जिल्हा परिषद शाळांची चमकदार कामगिरी; ५ वी व ८ वीतील ३९५ विद्यार्थी पात्र!

लंडनमध्ये उभारले जाणार ‘वैश्विक मराठी भाषा केंद्र’ – उदय सामंत यांची माहिती

स्वरमाऊली आशा भोसले यांच्या नावाने राज्य शासनाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’; संगीत विश्वातील दिग्गजांचा होणार १० लाख रुपयाने गौरव

“पोलीस राजकारण्यांचे नोकर नाहीत, जनतेचे सेवक आहेत” – हायकोर्ट

नवी मुंबईत मुसळधार पाऊस; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.