Lokrakshanay
Saturday, April 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मुलांच्या सुरक्षेसाठी अनधिकृत स्कुल व्हॅन टाळा! बदलापूर घटनेनंतर परिवहन विभागाचे पालकांना आवाहन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 24, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
मुलांच्या सुरक्षेसाठी अनधिकृत स्कुल व्हॅन टाळा! बदलापूर घटनेनंतर परिवहन विभागाचे पालकांना आवाहन
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : बदलापूर पश्चिम येथील एका शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर स्कुल व्हॅनचालकाकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक घटनेनंतर उप प्रादेशिक परिवहन विभागाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर इशारा दिला आहे. कोणत्याही खासगी, अनधिकृत किंवा शालेय परवाना नसलेल्या वाहनातून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, असे स्पष्ट आवाहन पालकांना करण्यात आले आहे.

बदलापूर येथे गुरुवारी एका चार वर्षाच्या चिमुकलीवर शाळेच्या गाडीत चालकाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी वाहनचालकाविरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत कठोर कारवाई सुरू आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार २४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून वाहन नोंदणी निलंबनासाठी वाहनमालकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच आरोपी वाहनचालकाची अनुज्ञप्तीही निलंबित करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असून, पालकांनी आपल्या पाल्याला केवळ नोंदणीकृत, परवानाधारक व नियमबद्ध स्कुलबस किंवा व्हॅनमधूनच शाळेत पाठवावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी केले आहे. अनधिकृत वाहनांचा वापर टाळून पालकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांच्याकडून शालेय वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू असून जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत तब्बल २५९ वाहनांवर कारवाई करत ७ लाख ८३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर जानेवारी २०२६ या महिन्यातच ३९ वाहनांवर कारवाई करून १ लाख ४० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

Previous Post

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २७ जानेवारीपासून १० टक्के पाणीकपात

Next Post

“हम मुंब्रा को हरा बना देंगे” म्हणणाऱ्या MIM च्या सहर शेखचा पोलिसांकडे माफीनामा

Next Post
“हम मुंब्रा को हरा बना देंगे” म्हणणाऱ्या MIM च्या सहर शेखचा पोलिसांकडे माफीनामा

“हम मुंब्रा को हरा बना देंगे” म्हणणाऱ्या MIM च्या सहर शेखचा पोलिसांकडे माफीनामा

BreakingNews

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.