Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

कल्याण हादरले! २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 13, 2026
in गुन्हेगारी, ठाणे
कल्याण हादरले! २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : प्रेम, विश्वास आणि सुरक्षित भविष्याचं स्वप्न दाखवून एका तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणात गंभीर आरोप होऊनही मुख्य आरोपीला अद्याप अटक न झाल्यानं मृत तरुणीच्या कुटुंबीयांचा संताप शिगेला पोहोचला आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा आणि प्रेमसंबंधांच्या नावाखाली होणाऱ्या छळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. छळ आणि आर्थिक फसवणुकीला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २८ डिसेंबर रोजी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृत तरुणी खासगी विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. पोलीस तपासात आणि कुटुंबीयांच्या तक्रारीतून समोर आलेल्या माहितीनुसार, २०२० सालापासून तिचे कौशिक प्रकाश पावशे याच्याशी प्रेमसंबंध होते. सुरुवातीला लग्नाचं वचन देऊन आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. मात्र, पुढील काळात हाच विश्वास तिच्यासाठी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळाचे कारण ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तरुणीला सतत मारहाण केली, तिच्यावर मानसिक दबाव टाकला आणि खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून लाखो रुपयांची रक्कम उकळली. नोकरीनिमित्त तरुणीची हैदराबादला बदली झाल्यानंतरही आरोपीने तिथे जाऊन तिला त्रास दिल्याचे पुरावे समोर आले आहेत. १६ ते २४ डिसेंबरदरम्यान तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण आणि जखमा स्पष्ट दिसत होत्या, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तरुणीच्या मृत्यूनंतर तिचा मोबाईल तपासण्यात आला असता काही महत्त्वाचे संदेश, चॅट्स आणि आर्थिक व्यवहाराचे तपशील आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. मृत्यूपूर्वीही तिच्या बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यात आल्याचे स्टेटमेंटमधून स्पष्ट होत असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. या सर्व बाबींच्या आधारे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप आरोपीवर करण्यात आला आहे.

Previous Post

अमेरिकेला भारतीय कोळंबीची चटक! शुल्कात वाढ केल्यानंतरही निर्यातीत वाढ

Next Post

आता एका सिगारेटसाठी मोजावे लागणार ७२ रुपये?

Next Post
आता एका सिगारेटसाठी मोजावे लागणार ७२ रुपये?

आता एका सिगारेटसाठी मोजावे लागणार ७२ रुपये?

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.