Lokrakshanay
Sunday, May 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

शिवसेना आणि मनसेची युती झाली – राज ठाकरेंची घोषणा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 24, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
शिवसेना आणि मनसेची युती झाली – राज ठाकरेंची घोषणा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ठाकरे बंधुंच्या युतीची अखेर आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा केली. मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत ही घोषणा करण्यात आली.

सुरूवातीला शिवसेना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. “आम्ही दोघेही आज इथे बसलो आहोत. आमचे आजोबा प्रबोधनकार संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत माझे वडील बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे या सर्वांनी संयुक्त  महाराष्ट्राच्या लढाईत संघर्ष केला. मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. त्याची आज आठवण होणे स्वाभाविक आहे. कारण मुंब महाराष्ट्राला मिळाल्यावर उपरे महाराष्ट्राच्या उरावर नाचायला लागले त्यावेळी न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म द्यावा लागला. मुंबई, महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे मनसुबे आखले होते. आज त्यांचेच प्रतिनिधी दिल्लीत बसलेत. ते आजही मुंबईच्या  चिंधड्या उडवण्याचे मनसुबे आखत आहेत. त्यामुळे आता जर आपण भांडत राहिलो तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी केलेल संघर्षाचा अपमान असले. आमचे कर्तव्य म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. मी गेल्यावेळीच म्हटले होते. आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी. मुंबई आणि महाराष्ट्रावर  वाकड्या नजरेने, कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचा खात्मा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत. आज महाराष्ट्रच नाही तर देश बघत आहे. विधानसभेवेळी भाजपने एक अपप्रचार केला होता. बटेंगे तो कटेंगे,  तसेच मी मराठी माणसाला सांगतो. आता चुकाल तर संपाल, आता फुटाल तर पूर्णपणे संपूरण जाल त्यामुळे तुटू नका फुटू नका, महाराष्ट्र, मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश आमच्या युतीच्या निमित्ताने महाराष्ट्राला देतो.  असा संदेश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

Previous Post

आपत्कालीन परिस्थितीत Google जीव वाचवणार!

Next Post

नववर्षाच्या आगमनाआधी हॉटेल्स, उपहारगृहांची तपासणी आवश्यक – मंत्री नरहरी झिरवाळ

Next Post
नववर्षाच्या आगमनाआधी हॉटेल्स, उपहारगृहांची तपासणी आवश्यक – मंत्री नरहरी झिरवाळ

नववर्षाच्या आगमनाआधी हॉटेल्स, उपहारगृहांची तपासणी आवश्यक - मंत्री नरहरी झिरवाळ

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.