Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

डोंबिवलीत घातक शस्त्रांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक, १३ गुन्हे दाखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 18, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
डोंबिवलीत घातक शस्त्रांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक, १३ गुन्हे दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : डोंबिवलीत देसलेपाडा येथील एका घरातून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने घातक शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. या शस्त्रांचा साठा करणारा इसम हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यात १२ आणि टिटवाळा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे, अशी माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी दिली.

रोशन हिरानंद झा (३३) असे अटक करण्यात आलेल्या सराईत शस्त्रास्त्र तस्कराचे नाव आहे. तो डोंबिवली पूर्वेतील २७ गावातील देसलेपाडा येथील न्यू गार्डियन शाळेजवळील गोकुळधाम टॉवरमध्ये राहत होता. देसलेपाडा भागात एका सोसायटीत एक इसम घातक शस्त्रास्त्र विक्री करण्यासाठी घेऊन आला आहे. ती शस्त्रे त्याने घरात लपून ठेवली आहे. तो ही शस्त्रे लवकर विक्री करून तेथून पळून जाणार आहे, अशी गुप्त माहिती कल्याण गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना गुरूवारी मिळाली होती. या गुप्त माहितीची खात्री पटल्यावर भोसले यांनी ही माहिती तात्काळ आपले वरिष्ठ अजित शिंदे यांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून रोशन झा राहत असलेल्या सदनिकेवर छापा टाकण्याचे नियोजन करण्यात आले. ठरल्या वेळेत गुन्हे शाखेच्या पथकाने झा राहत असलेल्या सदनिकेवर छापा टाकला. पोलिसांचा पाहताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याला ती संधी न देता सदनिकेत त्याला पकडण्यात आले. त्याच्या घराच्या झडतीतमध्ये बिछान्याखाली, स्नानगृह, स्वच्छतागृहात लपून ठेवण्यात आलेली तलवार, सुरा, खंजिर, पिस्तुले, जिवंत काडतुसे, चाकू असा शस्त्र साठा पथकाने जप्त केला.

Previous Post

विक्रोळी बुद्ध विहारातून गौतम बुद्धांची मूर्ती चोरणाऱ्यांना गजाआड

Next Post

मुंबईत सीएनजी पुरवठा खंडित, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Next Post
मुंबईत सीएनजी पुरवठा खंडित, वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबईत सीएनजी पुरवठा खंडित, वाहनांच्या लांबच लांब रांगा

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.