Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

विक्रोळी बुद्ध विहारातून गौतम बुद्धांची मूर्ती चोरणाऱ्यांना गजाआड

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 17, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
विक्रोळी बुद्ध विहारातून गौतम बुद्धांची मूर्ती चोरणाऱ्यांना गजाआड
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : विक्रोळी येथील बुध्द विहारातून भगवान गौतम बुध्दांची पुरातन मूर्ती चोरणाऱ्यांना विक्रोळी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या सहाय्याने अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे माग काढून पोलिसांनी दोन आरोपींना वांद्रे परिसरातून अटक केली. विक्रोळी कन्नमवार नगर येथे बुध्दविहार आहे. या बुध्दविहारात जपानी बनावटीची पुरातन बुध्द मूर्ती होती. त्या मूर्तीचे वजन सुमारे १३ किलो आहे. बुध्दविहारातील पंचधातूच्या मूर्तीची १३ नोव्हेंबर रोजी चोरी झाली होती. चोरीच्या घटनेमुळे परिसरात तणाव वाढला होता. याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चोरीच्या तपासासाठी विक्रोळी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली होती. पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसराचे सीसीटीव्ही तपासले. एक संशयित इसम पाठीवर पांढर्या रंगाची जड पिशवी घेऊन जात असल्याचे दिसले. पोलिसांनी मग सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या आधारे माग काढायला सुरवात केली. त्याने विक्रोळी स्थानकातून शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाकडे जाणारी ट्रेन पकडली. पोलिसांनी विक्रोळी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरातील सर्व सीसीटीव्हींचे चित्रिकरण तपासले. त्यावेळी संशयित इसम दादरला उतरला. तेथून ट्रेन बदलून तो पश्चिम रेल्वेच्या माहिम स्थानकात उतरला. पोलिसांनी मग माहिम स्थानकातील सीसीटीव्ही तपासले. तो माहिम पूर्वेच्या दिशेन जात असल्याचे दिसले. पोलिसांच्या पथकाने माहिम रेल्वेस्थानकाच्या पूर्वेचा परिसर पिंजून काढून तेथील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी संशयित इसम एका भंगारच्या दुकानात मूर्ती घेऊन जात असल्याचे दिसले. पोलिसांनी पुढील तपास केला असता संशयित आरोपीला वांद्रे परिसरात रहात असल्याचे दिसले. पोलिसांच्या पथकाने वांद्रे खार परिसरात सापळा लावून जितेंद्र बिनकर (४६) आणि त्याचा साथीदार मार्टीन कन्नन (४६) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरलेली भगवान गौतम बुध्दांची मूर्ती ताब्यात घेण्यात आली आहे.

Previous Post

लक्ष्मी निवास’ फेम अभिनेता अडकला लग्न बंधनात!

Next Post

डोंबिवलीत घातक शस्त्रांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक, १३ गुन्हे दाखल

Next Post
डोंबिवलीत घातक शस्त्रांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक, १३ गुन्हे दाखल

डोंबिवलीत घातक शस्त्रांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक, १३ गुन्हे दाखल

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.