Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home देश -विदेश

Period Leave : महिलांना मिळणार दर महिन्याला भरपगारी सुट्ट्या!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 10, 2025
in देश -विदेश
Period Leave : महिलांना मिळणार दर महिन्याला भरपगारी सुट्ट्या!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : घर आणि कामाची जबाबदारी संभाळणाऱ्या महिला पीरियड्सच्या दिवसांमध्ये वेगळ्या फेसमधून जात असतात. या काळात महिलांना आरामाची गरज असते. पण ऑफीसमधून दर महिन्याला सुट्टी मिळेलच असे नाही. पण असंही एकराज्य आहे, जिथे महिलांना आता दर महिन्याला भर पगारी सुट्टी मिळणार आहे. या निर्णयाचे देशभरातून स्वागत होतंय.

कर्नाटक सरकारने वर्कींग महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने ‘मासिक धर्म सुट्टी धोरण २०२५’ला मंजुरी दिली. याअंतर्गत सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या, आयटी क्षेत्र, बहुराष्ट्रीय संस्था आणि कपडा उद्योगातील महिलांना दरमहा एक दिवस सशुल्क पाळी सुट्टी मिळणार आहे.  वर्षाला १२ दिवस या सुट्ट्या असतील. ज्यामुळे महिलांना शारीरिक वेदना व मानसिक तणावातून मुक्ती मिळण्यास मदत होणार आहे. कर्नाटक हे देशातील पहिलं राज्य ठरले आहे. जिथे ही सुविधा सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रांना बंधनकारक आहे. बिहारमध्ये फक्त सरकारी महिलांना महिन्याला दोन दिवस, तर ओडिशात १२ दिवस सुट्टी मिळते. केरळ आणि सिक्किममध्येही अंशतः अंमलबजावणी आहे. जोमॅटो, स्विगी, एल अँड टी सारख्या कंपन्यांनी स्वतःहून ही सुट्टी सुरू केली होती, आता कर्नाटकात ती कायद्याने बंधनकारक झाली. ही योजना महिलांच्या शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया कायदामंत्री एच.के. पाटील यांनी दिली. कामगार मंत्री संतोष लाड म्हणाले, ‘महिलांवर घर आणि कामाची दुहेरी जबाबदारी असते. ही सुट्टी त्यांना दिलासा देईल.’

Previous Post

४ तासांचा प्रवास दीड तासांत! विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम लवकरच सुरू

Next Post

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर!

Next Post
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर!

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर!

BreakingNews

शुभमन गिलचा विश्वविक्रमांचा धडाका! २२३ धावांच्या वादळी खेळीने भारताचा विक्रमी विजय

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.