पुणे : पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात होणार आहे. कारण, पुण्यात फटाक्यांची दुकानं २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून २१ ऑक्टोबरपर्यंत फटाक्यांची दुकानं २४ तास खुले ठेवण्याची परवानगी दिली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. दिवाळीच्या निमित्त पोलिस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. पण फक्त परवानाधारक फटाका स्टॉलच २४ तास खुले राहणार आहेत. त्यामुळे दिवाळीत पुणेकरांना कोणत्याही वेळी फटाके खरेदी करता येणार आहेत.