वृत्तसंस्था :भारतामध्ये विकसित करण्यात आलेलं ‘Mappls’ App सध्या देशभरात चर्चेत आलं आहे. MapmyIndia कंपनीने तयार केलेल्या या स्वदेशी App मध्ये व्हॉईस गाइडेड नेव्हिगेशन, रिअल-टाइम ट्रॅफिक अपडेट्स आणि हायपर-लोकल सर्च…अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळेच हे App गुगल मॅप्सचा मजबूत भारतीय पर्याय ठरत आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच स्वतः या App चा वापर करत असलेला एक व्हिडिओ शेअर केला आणि भारतीयांना हे App नक्की वापरून पहा, असं आवाहनदेखील केलं. सरकारच्या मते, हा उपक्रम डिजिटल आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे.
Mappls Appचं सर्वात महत्वाचं फीचर म्हणजे त्याचा 3D जंक्शन व्यू. या फीचर युजर्सना फ्लायओव्हर, अंडरपास आणि गुंतागुंतीच्या रस्त्यांची थ्री-डी इमेज पाहता येते, ज्यामुळे चुकीच्या रस्त्यावर जाण्याची किंवा अपघाताची शक्यता कमी होते. हे फीचर विशेषतः चर्चेत येण्याचं म्हणजे, २०२४ मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या एका दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला होता. गुगल मॅपने अपूर्ण पुलाचा रस्ता दाखवल्यामुळे गाडी थेट पुलावरुन नदीत कोसळली होती. Mappls ची हे अपडेटेड सिस्टम अशा प्रकारच्या धोक्यांपासून बचाव करण्यात मदत करेल. याशिवाय, या App मध्ये इनडोअर नेव्हिगेशनची सुविधाही आहे, जी मॉल्स किंवा मल्टी-स्टोरी इमारतींमध्ये अचूक मार्ग दाखवते. ही सुविधा बहुतांश आंतरराष्ट्रीय मॅप Apps मध्ये अद्याप उपलब्ध नाही. Mappls चं आगमन हे भारतातील स्वदेशी टेक्नॉलॉजी चळवळीचं आणखी एक यश आहे. यापूर्वी Zoho कंपनीचs ‘Arattai’ चॅट App लोकप्रिय झालं. डेटा सुरक्षेवर भर, भारतीय सर्व्हरवर आधारित प्रणाली आणि ‘डिजिटल आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेशी सुसंगत दृष्टिकोनामुळे Mappls आता Google Maps ला पर्याय ठरत आहे. सरकारचा पाठिंबा आणि युजर्सचा वाढता विश्वास पाहता, हे App भारताला डिजिटल स्वावलंबनाच्या नव्या दिशेनं नेणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.