Lokrakshanay
Sunday, September 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

डोंबिवलीतील ज्येष्ठ रंगकर्मी सुधाकर इनामदार यांचे निधन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 13, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
डोंबिवलीतील ज्येष्ठ रंगकर्मी सुधाकर इनामदार यांचे निधन
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : नाट्य क्षेत्र आणि रंगभूमीवर ५५ वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेले डोंबिवलीतील ज्येष्ठ रंगकर्मी सुधाकर श्रीनिवास इनामदार यांचे रविवारी येथे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी प्रमिला, दोन विवाहित मुलगे, मुलगी, जावई, नातवंंडे असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा मिलिंद इनामदार हे नाट्य क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुंबई विद्यापीठाच्या ॲकेडमी ऑफ थिएटर्स येथे मार्गदर्शन करतात. नाट्य कलेचा प्रचार आणि प्रसाराठी सुधाकर इनामदार यांनी नाट्य दुदुंभी नावाची संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ६० वर्ष नाट्यविषयक विविध उपक्रम राबविले. हौशी, गुणवान कलाकार म्हणून सुधाकर इनामदार यांची ओळख होती. ते ‘सुश्री’ या नावाने ओळखले जात होते. ते कवी होते. ‘माणुसकीचा पाझर’, ‘माणुसकीचे गेंद फुलावे’, हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत.

सुधाकर इनामदार मुळचे सातारा जिल्ह्यातील वरूड गावचे. शिक्षण, नोकरीनिमित्त ते कुटुंबियांसमवेत मुंबईत आले. त्यानंतर ते डोंबिवलीत स्थायिक झाले. भारतीय आयुर्विमा महामंडळात त्यांनी आपली नाट्य कलेची आवड जोपासत वरिष्ठ साहाय्यक म्हणून सेवानिवृ्तीपर्यंत नोकरी केली. नाट्य दुदुंभी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शंभरहून अधिक नाटके, एकांकिकांमधून भूमिका साकारल्या. अनेक नामवंत नाट्य कलाकारांच्या जोडीने काम केले. नामवंत नाटककारांच्या नाटकासह स्वलिखित ६० हून अधिक नाटकांचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन केले. ‘यंदा कर्तव्य आहे’ या स्वलिखित विनोदी बहुपात्री नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग सुश्रींनी केले. ‘प्रेमाची गोष्टच निराळी,’ ‘प्रश्न संस्काराचा आहे,’ अशा सामाजिक आशयाची नाटके त्यांनी लिहिली. ३५ हून अधिक नाटकांचे लेखन सुश्रींनी केले. विविध वृत्तपत्रांमध्ये नाट्यविषयक ४०० हून अधिक लेख लिहिले. अनेक नाट्यविषयक कार्यक्रमांमध्ये ते परीक्षक म्हणून काम करत होते. डोंबिवली, कल्याण शहर परिसरातील नवोदित कलाकार, एकांकिका सादर करणाऱ्या कलाकारांसाठी नाट्य भवन असावे, अशी त्यांची अनेक वर्षांची मागणी होती. ते शासन, कल्याण डोंबिवली पालिकेत अनेक वर्ष या मागणीचा पाठपुरावा करत होते. ही मागणी शासकीय लालफितीमुळे मान्य होऊ शकली नाही. त्यांच्या निधनाबद्दल अनेक नाट्य रंगकर्मींनी शोक व्यक्त केला आहे.

Previous Post

‘कोकण कोहिनूर’ची घरवापसी! ओंकार भोजने पुन्हा दिसणार हास्यजत्रेत

Next Post

भारताने विकसित केले गुगल मॅप ला टक्कर देणारे ‘Mappls’ App

Next Post
भारताने विकसित केले गुगल मॅप ला टक्कर देणारे ‘Mappls’ App

भारताने विकसित केले गुगल मॅप ला टक्कर देणारे ‘Mappls’ App

BreakingNews

ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूल काँग्रेसमधील बंडानंतर पक्षाचे अधिकृत चिन्ह गोठवले

गणेशोत्सवात दादरच्या उद्यान गणेश मंदिराला महापालिकेची नोटीस; अनधिकृत शेड आणि स्टॉल्स हटवण्याचे आदेश

१५ ऑक्टोबरपासून मुंबईतील पेट्रोल पंपांवर UPI बंद? MDR शुल्काविरोधात पेट्रोल डीलर्सचा आक्रमक इशारा

आयफोन १८ प्रो लाँचचा जल्लोष; नवीन मॉडेल खरेदीसाठी देशभरात ग्राहकांची झुंबड

अंधेरी मेट्रो स्थानकात लवकरच विश्रांतीसह मुक्काम; पर्यटकांच्या सोयीसाठी पॉड हॉटेल सज्ज

ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासनाचा पुढाकार; मातोश्री वृद्धाश्रमात जनजागृती अभियान

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.