Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मध्य रेल्वे दुर्घटना: कोपर स्थानकात तरुणाची एक्सप्रेसखाली आत्महत्या

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 13, 2025
in ठाणे
मध्य रेल्वे दुर्घटना: कोपर स्थानकात तरुणाची एक्सप्रेसखाली आत्महत्या
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्थानका जवळील कोपर रेल्वे स्थानकात रविवारी दुपारी एका ३५ वर्षाच्या तरूणाने मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील एक्सप्रेसखाली झोकून आत्महत्या केली. या तरूणाचे नाव आणि त्यांची ओळख पटलेली नाही. अचानक घडलेल्या या प्रकाराने कोपर रेल्वे स्थानकातील प्रवासी काही क्षण घाबरले. कोपर रेल्वे स्थानकात रविवार असल्याने तुरळक गर्दी होती. मोजकेच प्रवासी आणि रेल्वे सुरक्षा बळाचे कमांडो रेल्वे स्थानकात गस्त घालत होते. काही प्रवासी जिन्यावरून, रेल्वे मार्ग ओलांडून येजा करत होते. बराच उशीर एक तरूण कोपर रेल्वे स्थानकात रेंगाळत होता. तो प्रवासी म्हणून रेंगाळत असेल असे प्रवाशांना वाटले. हा तरूण ३५ वर्षाचा होता. त्याच्या पाठीला पिशवी होती.हा तरूण प्रवाशासारखा कोपर रेल्वे स्थानकात रेंगाळत होता.

तो जीवाचे बरेवाईट करण्यास आला आहे असे कोणाही प्रवाशाला वाटले नाही. काही वेळाने हा तरूण कोपर रेल्वे स्थानकात पूर्व बाजुच्या दिशेने फलाटावरून उडी मारून रेल्वे मार्ग ओलांडून पूर्व भागातील बालाजी गार्डन संकुलाच्या दिशेने जाऊ लागला. तो पूर्व भागात जात असावा असे प्रवाशांना वाटले. पण तेवढ्यात कल्याण दिशेकडून भरधाव वेगाने मुंबईला जाणारी एक्सप्रेस आली. हे रेल्वे मार्ग ओलांडून जाणारा तरूण पाहत होता. तरीही त्याने एक्सप्रेस जवळ येताच भरधाव वेगातील त्या एक्सप्रेसखाली स्वताहून झोकून उडी मारली. काही क्षणात तो एक्सप्रेस इंजिनच्या धडकेत दूरवर फेकला गेला. हा प्रकार पाहताच कोपर रेल्वे स्थानकातील प्रवासी काही क्षण घाबरले. एक्सप्रेस तेथून निघून जाताच रेल्वे स्थानकातील कमांडोने ही माहिती तात्काळ डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या तरूणाला रग्णवाहिकेतून पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथे त्या तरूणाला मृत घोषित करण्यात आले.

Previous Post

वाघोलीत अफू विक्री करणारा गजाआड, २२ लाखांचा अफू जप्त

Next Post

नवी मुंबई-ठाणे परिसरात सायबर गुन्हेगारीचा कहर; एकाच दिवशी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची फसवणूक

Next Post
नवी मुंबई-ठाणे परिसरात सायबर गुन्हेगारीचा कहर; एकाच दिवशी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची फसवणूक

नवी मुंबई-ठाणे परिसरात सायबर गुन्हेगारीचा कहर; एकाच दिवशी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची फसवणूक

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.