Lokrakshanay
Wednesday, April 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

मोखाडा पोलिसांची कामगिरी: १२ तासांच्या आत खूनाच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 8, 2025
in गुन्हेगारी, पालघर
मोखाडा पोलिसांची कामगिरी: १२ तासांच्या आत खूनाच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना अटक
Share on FacebookShare on Whatsapp

पालघर : पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केवळ १२ तासांच्या आत खूनाच्या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना अटक करत उत्कृष्ट तपास कौशल्य दाखवले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, आता पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी फिर्यादी सोमनाथ नवसु फुफाणे (वय २० वर्षे, व्यवसाय शेती/मजुरी, रा. सातुर्ली, ता. मोखाडा, जि. पालघर) यांनी मोखाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादींचे वडील नवसु लाडक्या फुफाणे (वय ५५ वर्षे) हे घरी असताना आरोपी १) जितेंद्र उर्फ जितु जयराम पाटील (३१), २) रितेश उर्फ गुड्डा तुकाराम पाटील (२३), आणि ३) प्रमोद उर्फ पन्या चिंतामण वारघडे (२५), सर्व रा. सातुर्ली, ता. मोखाडा यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

नवसु फुफाणे यांनी आरोपींना “शेताजवळील नदीपात्रात विषारी औषध टाकून मासे मारू नका” असे सांगितल्याचा राग आरोपींनी मनात धरला होता. याच कारणावरून तिघांनी मिळून ६ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास नवसु फुफाणे व त्यांच्या मुलगा सोमनाथ यांना घरात येऊन शिवीगाळी, दमदाटी केली आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर नवसु फुफाणे यांना कास बांधून रस्त्याने ओढत नेले आणि गावात नेऊन पुन्हा निर्दयीपणे लाथाबुक्यांनी व लाकडांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर मोखाडा पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १८१/२०२५ भारतीय दंड संहिता कलम १०३(१), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Previous Post

दिवाळीत रात्री १० नंतर फटाके वाजवण्यास बंदी, पोलिसांचे आदेश

Next Post

मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताचा वेग आणि विकास अधोरेखित – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Next Post
मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताचा वेग आणि विकास अधोरेखित – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताचा वेग आणि विकास अधोरेखित - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

BreakingNews

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.