Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

गावच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 16, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
गावच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : प्रत्येक गाव समृद्ध झाले तर, राज्यही समृद्ध होईल या उद्देशाने राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला असून हे अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर याकालावधी पर्यंत राबविले जाणार आहे. या अभियानात सुशासन युक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा अशा विविध घटकांवर त्या त्या ग्रामपंचायतीला गुण दिले जाणार आहेत. या घटकांशी निगडित विविध उपक्रम तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावर राबविले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली.

ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी कल्याण तालुक्यातील खोणी येथे आयोजित करण्यात आला आहे. या अभियाना संदर्भातील माहिती देण्यासाठी मंगळवारी, आज ठाणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद पार पडली. यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभियानातील उपक्रमांची माहिती दिली. या अभियानासाठी तालुका स्तरावरील पंचायत समितीच्या सर्व विभागातील विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, कृषी अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य पर्यवेक्षक आणि अन्य क्षेत्रिय अधिकाऱ्यांची प्रत्येक गावासाठी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, जिल्हा स्तरावरुन तालुका नोडल अधिकारी म्हणून जिल्हास्तरीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अभियान विशेष काही घटकांवर राबविले जाणार असून त्या घटकांची योगरित्या अंमलबजावणी केल्यास गुण दिले जाणार असून त्यावर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला पुरस्कार दिले जाणार आहेत.

 

Previous Post

ठाणे, डोंबिवली परिसरातील ७० महिला शिक्षिकांना ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’

Next Post

आचार्य अत्रे चौक ते कफ परेड मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Next Post
आचार्य अत्रे चौक ते कफ परेड मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

आचार्य अत्रे चौक ते कफ परेड मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.