Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ढोल- ताशा पथकबाबत काँग्रेसची मागणी, सर्व पथकांना ..

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 8, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
ढोल- ताशा पथकबाबत काँग्रेसची मागणी, सर्व पथकांना ..
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी तसेच शहरात होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीची शोभा वाढविण्यामध्ये महत्वाची भूमिका ढोल- ताशा पथक बजाविते. या ढोल पथकांना सरावासाठी अधिकृतपणे जागा द्यावी, तसेच त्यांच्या वाद्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले आहे. मागील वर्षी मुठेला आलेल्या पुरात पथकांची वाद्ये वाहून गेली होती, तसेच सरावासाठी जागा नसल्याने शहराच्या निवासी वस्त्यांमध्ये त्यांना सराव करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महापालिका आयुक्तांकडे ही मागणी केली आहे.

शहरातील युवकांनी गेल्या काही वर्षांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचा चेहरामोहरा बदलला आहे. ढोल ताशा, झांज, लेझीम अशा खेळांना मिरवणुकीत वाव मिळतो आहे. त्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. गणेश उत्सवाच्या आधी महिनाभर ही पथके सराव करीत असतात. मात्र, सरावासाठी त्यांना जागा नसते. त्यामुळे निवासी वस्त्यांमध्ये असलेल्या जागेत ते सराव करतात. परिसरातील रहिवाशांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे महापालिकेने नदीपात्रातील जागेत अधिकृतपणे गाळे तयार करावेत. तिथे या पथकांना जागा उपलब्ध करून द्यावी. वेळ ठरवून द्यावी. आवश्यकता भासल्यास महापालिकेने यासाठी या ढोल ताशा पथकांकडून नाम मात्र शुल्क देखील घ्यावे. यामुळे या सर्व पथकांना अधिकृत जागा मिळेल. मागील वर्षी पुरामुळे अनेक पथकांची वाद्ये वाहून गेली. ढोल, ताशे महागडे असतात. ते खराब झाल्याने पथकांना ते नव्याने विकत घ्यावे लागले. ही बाब त्यांना न परवडणारी आहे. त्यामुळे त्यांची वाद्य ठेवण्यासाठी म्हणून महापालिका प्रशासन त्यांना शाळांच्या खोल्या उपलब्ध करून देऊ शकते, असेही तिवारी यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Previous Post

सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्यास शासनाकडून मनाई

Next Post

धोकादायक ६१ पूल तीन महिन्यांत पाडले जाणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

Next Post
धोकादायक ६१ पूल तीन महिन्यांत पाडले जाणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

धोकादायक ६१ पूल तीन महिन्यांत पाडले जाणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.