Lokrakshanay
Saturday, June 27, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महिलांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक वाहनांमध्ये पॅनिक बटण बसवण्याची कार्यवाही सुरू

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 7, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
महिलांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक वाहनांमध्ये पॅनिक बटण बसवण्याची कार्यवाही सुरू
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईत काही दिवसांपूर्वी कॅबचालकाविरुद्ध महिला वैमानिकाने तक्रार दिली होती. त्यामुळे सार्वजनिक प्रवासी वाहनांमधील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्ये आता पॅनिक बटण बसवण्याची कार्यवाही सुरू झाली असून, एक नियंत्रण कक्ष मुंबईत उभारला आहे, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. विधान परिषदेत आ. सत्यजित तांबे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. दिल्लीतील निर्भया अत्याचार घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी १ जानेवारी २०१९ पासून सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्ये पॅनिक बटण अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्य सरकानेही त्याला मान्यता दिली आहे. मात्र, ३१ मार्च २०२५ पर्यंत राज्यात पॅनिक बटणचे कंट्रोल सेंटर उभारलेले नाही, हे खरे आहे का? असा सवाल तांबे यांनी केला. त्यावर उत्तर देताना सरनाईक यांनी नियंत्रण कक्षाची उभारणी अंधेरी येथील आरटीओ कार्यालयात केली आहे, असे स्पष्ट केले.

२०१९ पूर्वीच्या जुन्या सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्येही पॅनिक बटण बसवणे अनिवार्य असल्याची सूचना केंद्र सरकारने केली होती. मात्र, राज्य सरकारने यासंदर्भातील धोरण निश्चित केलेले नाही. त्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवूनही त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही, अशी विचारणाही तांबे यांनी केली. सरनाईक यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्ये पॅनिक बटण बसवण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे. २०१९ नंतर नोंदणी केलेल्या सार्वजनिक प्रवासी वाहनांत हे बटण बसवणे बंधनकारक आहे. त्यानुसार हे बटण बसविण्यात आले असून, ही यंत्रणा कार्यान्वित असल्याची पडताळणी करण्यात येते. सार्वजनिक प्रवासी वाहनांचा परवाना नूतनीकरण, फिटनेस आदी करतानाही पॅनिक बटण बसविले असल्याची खात्री करूनच परवाना दिला जातो, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Previous Post

नैसर्गिक ओढे, नाल्यांचा प्रवाह रोखणाऱ्यांविरोधात पीएमआरडीएने केले गुन्हे दाखल

Next Post

सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्यास शासनाकडून मनाई

Next Post
सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्यास शासनाकडून मनाई

सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्यास शासनाकडून मनाई

BreakingNews

१ जुलैपासून पासपोर्ट महागणार; १४ वर्षांनंतर शुल्कात मोठी वाढ!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण मोठ्या पडद्यावर; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा!

मलंगगडाचा कायापालट! ३५०० पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी

महिला सुरक्षेसाठी ‘खाकीतील सखी’ उपक्रमाला बळ; ठाणे स्थानकात जनजागृती मोहीम!

खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी ‘सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश’; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतासमोर आज ‘करा किंवा मरा’चा सामना!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.