Lokrakshanay
Sunday, May 31, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मुंबई

कुर्ल्यातील बेस्ट अपघातात ५ जणांचा मृत्यू तर ३० पेक्षा जास्त जखमी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 10, 2024
in मुंबई
कुर्ल्यातील बेस्ट अपघातात ५ जणांचा मृत्यू तर ३० पेक्षा जास्त जखमी
Share on FacebookShare on Whatsapp

कुर्ला लाल बहादूर शास्त्री मार्गावर झालेल्या मोठ्या अपघातात बेस्ट उपक्रमाच्या बसनं अनेक पादचाऱ्यांना चिरडलं. कुर्ला लाल बहादूर शास्त्री मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली. या अपघातात २० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बेस्ट बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच, पोलिसांनी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

आता या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती. त्यावेळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झालेले. ३३२ नंबरची बस कुर्ला कडून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे.

कुर्ला येथील बेस्ट बस अपघातात आतापर्यंत मृतांचा आकडा ५ झाला आहे. तर जखमी २० पेक्षा जास्त जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विजय विष्णू गायकवाड(७०), आफ्रीन अब्दुल सलीम शहा(१९), अनम शेख(२०), कणीस फातिमा गुलाम कादरी(५५), शिवम कश्यप(१८) अशी मृतांची नावं आहेत. ज्यावेळी हा अपघात घडला, त्यावेळी अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल ६० प्रवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

कुर्ला येथील बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरे (५४) या बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलीस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Previous Post

उद्योगपती राज कुंद्रा पुन्हा ईडी चौकशीला अनुपस्थित राहिला

Next Post

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांनी बंगळुरूत घेतला शेवटचा श्वास

Next Post
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांनी बंगळुरूत घेतला शेवटचा श्वास

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांनी बंगळुरूत घेतला शेवटचा श्वास

BreakingNews

‘देऊळ बंद २’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; लवकरच येणार ‘मुळशी पॅटर्न २’

मुंबई महापालिकेची डिजिटल झेप; भारतातील पहिली एआय आधारित बांधकाम परवानगी प्रणाली सुरू

मुंबईत CNG-PNG दरवाढीचा आणखी झटका; १५ दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

ईदनिमित्त ‘मैं हूँ…’ गाण्याची खास भेट; सलमान खानचा रोमँटिक अंदाज चर्चेत!

१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; नर्दुल्ला टँक मैदान वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.