Lokrakshanay
Wednesday, June 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

मद्यधुंद चालकाने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करून केली मारहाण

भिवंडी येथे मद्यपी वाहन चालकावर कारवाई केल्याने पोलीस नाईक संतोष गोड यांना पाच जणांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 6, 2024
in गुन्हेगारी, ठाणे, ताज्या बातम्या
मद्यधुंद चालकाने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करून केली मारहाण
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : भिवंडी येथे मद्यपी वाहन चालकावर कारवाई केल्याने पोलीस नाईक संतोष गोड यांना पाच जणांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. भिवंडी शहर वाहतुक उपशाखेचे पोलीस नाईक संतोष गोड हे सोमवारी मद्यपी चालकांविरोधात कारवाई करत होते. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास एक दुचाकी त्याठिकाणी आली. पोलिसांनी त्या दुचाकीस्वार आणि त्याच्या सहकाऱ्याला अडविले. त्यांनी मद्याचे सेवन केले आहे का, हे तपासण्यासाठी त्यांना कार्यालयात नेण्यात आले. श्वास विश्लेषक यंत्राद्वारे (ब्रेथ ॲनालायझर) तपासणी केली असता, त्यांनी मद्याचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. त्यांची दुचाकी कल्याणनाका येथे उभी असल्याने संतोष गोड हे दुचाकीस्वाराच्या सहकाऱ्यासोबत ती दुचाकी आणण्यासाठी तेथे गेले. त्याचवेळी चारजण एका मोटारीतून त्याठिकाणी आले.

तसेच का कारवाई केली अशी विचारणा त्यांनी संतोष यांना केली. संतोष गोड यांनी त्यांना बाजूला होण्यास सांगितले. त्यावेळी झालेल्या वादातून मोटारीतील चार जण आणि दुचाकी स्वाराच्या सहकाऱ्याने संतोष गोड यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. दरम्यान, संतोष यांनी त्यांच्या सहकाऱ्याला मदतीसाठी बोलावले. तसेच मारहाणी दरम्यान संतोष यांनी मारहाण करणाऱ्यांपैकी प्रदीप कोकूल याला पकडले. संतोष यांचे सहकारी येत असताना मारहाण करणारे पळून गेले. याप्रकरणी पाचही जणांविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्रदीप याला अटक केली आहे. तर त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

Previous Post

ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार; १८६ विद्युत बसगाड्या वर्षभरात टिएमटीच्या ताफ्यात

Next Post

ठाणे महापालिका प्रशासनाने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी (सॅटिस) प्रकल्प हाती घेतला

Next Post
ठाणे महापालिका प्रशासनाने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी (सॅटिस) प्रकल्प हाती घेतला

ठाणे महापालिका प्रशासनाने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी (सॅटिस) प्रकल्प हाती घेतला

BreakingNews

टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी उठली!

माहितीचा अधिकार नियम २०२६ विरोधात अण्णा हजारे मैदानात!

बेस्टचा संप मिटला, मुंबईत बस सेवा पुन्हा सुरू!

चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.