Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

३०० घड्याळांची चोरी, अखेर ‘काळू’ पकडला गेला; सीसीटीव्ही फुटेजमधून खुलासा झाला

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 15, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
३०० घड्याळांची चोरी, अखेर ‘काळू’ पकडला गेला; सीसीटीव्ही फुटेजमधून खुलासा झाला
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : कळव्यातील मनीषानगर भागातील दुकानाच्या गोदामातून सुमारे ३०० घड्याळांची चोरी करणाऱ्या सरूद्दीन ऊर्फ कालू ताजुद्दीन शेख (३२, रा. संजय नगर, मुंब्रा, ठाणे) या सराईत चोरट्याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी रविवारी दिली. त्याच्याकडून १६९ घड्याळे हस्तगत करण्यात आली आहेत. कळव्यातील मनीषा नगरातील रहिवासी रितेश आडिया (वय ४८) यांच्या घड्याळाच्या गोदामात विक्रीसाठी ३०० पेक्षा अधिक मनगटी घड्याळे त्यांनी ठेवली होती. या गोदामाच्या दरवाजाला लावलेले कुलूप कटावणीच्या साहाय्याने तोडून चोरट्यानी गोदामात शिरकाव करून सुमारे ३०० घड्याळांची चोरी केल्याचा प्रकार ३ जुलै २४ रोजी पहाटे १:३० वाजता घडला होता.

याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ),३३१ (३),३३१ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेख याने गोदामातून प्रत्येकी ३०० रुपये किमतीची ९० हजारांची ३०० घड्याळे चोरली होती. त्यापैकी ५० हजार ७०० रुपयांची १६९ घड्याळे हस्तगत केली आहेत. चौकशीत दिली चोरीची कबुली, गुन्हा दाखल झाल्यानंतर कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सागर सांगवे आणि त्यांच्या पथकातील पोलिस हवालदार शहाजी एडके, रमेश पाटील, गणेश बांडे, श्रीमंत राठोड, राहुल पवार, अमोल ढावरे आणि अंमलदार प्रशांत लवटे आदींनी गोदाम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून काही खबऱ्यांच्या मदतीने आरोपीला मुंब्य्रातील संजयनगर भागातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याविरोधात मिळालेल्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. सरुद्दीनविरुद्ध ठाणे आणि मुंबई शहरातील विविध पोलिस ठाण्यांत चोरी तसेच घरफोडीच्या विविध कलमांखाली १३ गुन्हे दाखल आहेत.

Previous Post

नव्याने विस्तारित केलेल्या ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर तुंबले पाणी

Next Post

कल्याणमध्ये वेश्या व्यवसायात तरूणींना आणून पैसे कमावणारी महिला अटक

Next Post
कल्याणमध्ये वेश्या व्यवसायात तरूणींना आणून पैसे कमावणारी महिला अटक

कल्याणमध्ये वेश्या व्यवसायात तरूणींना आणून पैसे कमावणारी महिला अटक

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.