Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पायऱ्यांची केली नासधूस, पालिकेकडून डागडुजी; बाणगंगा तलावाच्या कंत्राटदारावर गुन्हा

बाणगंगा ही पुरातन वास्तू असून पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निर्देशानुसार मुंबई पालिकेने बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 26, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
पायऱ्यांची केली नासधूस, पालिकेकडून डागडुजी; बाणगंगा तलावाच्या कंत्राटदारावर गुन्हा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : ऐतिहासिक बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत कामे करताना तलावाच्या उत्तर प्रवेशद्वारावरून आतमध्ये एक्सकॅव्हेटर मशिन उतरवून तलावांच्या पायऱ्यांचे नुकसान केल्याबद्दल मुंबई पालिकेने कंत्राटदार मे. सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेडला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच तलावास हानी पोहोचवून नुकसान केल्याबद्दल मलबार हिल पोलीस ठाण्यात एफआयआरही दाखल केली आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या पायऱ्यांची डागडुजी पालिकेने केली आहे.

बाणगंगा ही पुरातन वास्तू असून पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निर्देशानुसार मुंबई पालिकेने बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. पालिकेने विशेष प्राधान्य प्रकल्प म्हणून त्याची घोषणा करत निविदा प्रक्रिया राबविली. त्यानंतर कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. पुनरुज्जीवन प्रकल्पाचा एक भाग म्हणून मुंबई पालिकेने आतापर्यंत तलावाच्या बाजूची सर्व बांधकामे हटवली आहेत. तसेच दीपस्तंभांची डागडुजी केली आहे. शिवाय प्रकल्पाचा भाग म्हणून तलावातील गाळ काढण्यासाठी कंत्राटदाराकडून एक्सकॅव्हेटरमशिन तलावाच्या उत्तर दिशेच्या प्रवेशद्वाराने उत्तरवले. या बाबतची माहिती मिळताच पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाने काम थांबविले आणि मशिन बाहेर काढले आहे. मंगलप्रभात लोढा यांनी बाणगंगा तलावाला भेट देत नुकसान झालेल्या पायऱ्यांची पाहणी केली.यावेळी पायऱ्यांची तातडीने डागडुजी करण्याचे निर्देश लोढा यांनी दिले. पालिकेने त्या पायऱ्या व काढून ठेवलेले दगड यांची पुनर्स्थापना करण्याचे काम पूर्ण केले. उर्वरित कामेही येत्या काळात केली जाणार आहेत. भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये, यासाठी स्थानिकांची एक कमिटीही स्थापन करण्यात येणार आहे. ही कमिटी पुढे होणाऱ्या कामकाजावर देखरेख ठेवेल. संपूर्ण घटनेची तपासणी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन केली जाणार असून, ती पुढील १५ दिवसांत अहवाल सादर करेल.

अंतर्गत सुरु असलेली कामे-

१) बाणगंगा तलावातील दगडी पायऱ्यांची सुधारणा

२) तलाव परिसरातील दीपस्तंभांची डागडुजी करणे.

३) तलावामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करणे.

४) तलावाच्या दगडी पायऱ्यांवरील अतिक्रमण हटविणे.

५) रामकुंडाचे पुनरुज्जीवन करणे,

६) बाणगंगा परिसरातील मंदिरांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करणे व योजनाबद्ध पद्धतीने रूपरेषा ठरविणे.

Previous Post

मनपा संरक्षण दलाला देणार ११ कोटी; चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड विस्ताराचा मार्ग झाला मोकळा

Next Post

माटुंग्यात मुक्त ग्रंथालयाचा प्रयोग; आता निसर्गरम्य वातावरणात जोपासा वाचनाचा छंद

Next Post
माटुंग्यात मुक्त ग्रंथालयाचा प्रयोग; आता निसर्गरम्य वातावरणात जोपासा वाचनाचा छंद

माटुंग्यात मुक्त ग्रंथालयाचा प्रयोग; आता निसर्गरम्य वातावरणात जोपासा वाचनाचा छंद

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.