Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

मुंबईत ५ महिन्यांत ३५५ गुन्हे, दोघे जेरबंद; ऑनलाइन गुंतवणूक करताय तर सावधान!

गेल्या पाच महिन्यांत ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली केलेल्या फसवणुकीचे सर्वाधिक ३५५ गुन्हे नोंद झाले आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 15, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या
सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा ‘हा’ नवा प्रकार, ‘ऑनलाइन टास्क’पासून सावधान!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखवत एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला पाच कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोघांना अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या पाच महिन्यांत ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली केलेल्या फसवणुकीचे सर्वाधिक ३५५ गुन्हे नोंद झाले आहेत. त्यामुळे ऑनलाइन गुंतवणूक करताना सावध राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. इंश्युरन्स/ पीएफ ०५ करन्सी १८ सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या तक्रारीनुसार, जानेवारीमध्ये तो एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी झाला. त्या ग्रुपमध्ये ऑनलाइन शेअर ट्रेडिंगबाबत चर्चा होत असत. त्यावरील नफ्याच्या चर्चा लक्षात घेत त्यानेही गुंतवणुकीचा निर्णय घेतला. त्याकरिता आरोपींनी त्याला ‘रिटेल होम’ ॲप डाउनलोड करण्यास सांगून त्याचे व्हर्चुअल अकाउंटही तयार केले. त्याच्यासह कुटुंबातील आणखी तिघांनी यात सहभाग घेतला. टॅक्ससह विविध कारणे पुढे देण्यास सुरुवात केली.

संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने, पैसे ट्रान्सफर केलेल्या बँक खातेधारकांपैकी सुरक्षारक्षक हमप्रीतसिंग रंधवा (३४) आणि खासगी शिकवणी घेणारा विमलप्रकाश गुप्ता (४५) यांना अटक केली आहे. रंधवा याने १० हजारांत त्याचे बँक खाते सायबर भामट्यांना विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. तक्रारदार आणि त्याच्या कुटुंबीयांनी जानेवारी ते मार्चदरम्यान एकूण पाच कोटी १४ लाख रुपये जवळपास ५० बँक खात्यांत ट्रान्सफर केले. या गुंतवणुकीवर त्यांना ॲपवर ८१ कोटींच्या घरात नफा दाखविला जात होता. ते पैसे काढण्याचा त्यांनी प्रयत्न करताच आरोपींनी टॅक्ससह विविध कारणे पुढे देण्यास सुरुवात केली. सायबर गुन्हेगार अशाच प्रकारे गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांचे बँक खाते रिकामे करत आहेत. गेल्या पाच महिन्यांत सायबरशी संबंधित एकूण दोन हजार १९७ गुन्ह्यांची नोंद सायबर पोलिसांच्या दफ्तरी झाली आहे. यापैकी ४२२ गुन्ह्यांची उकल करत ५१२ जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यातील एक हजार ३२२ घटनांमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सर्वाधिक ३५५ गुन्हे आहेत. त्यापैकी ७६ गुन्ह्यांची उकल करत २१ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

Previous Post

उत्पादन शुल्क विभागाच्या अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारणीला गती द्यावी – मंत्री शंभुराज देसाई

Next Post

गोवंडीत बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

Next Post
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक

गोवंडीत बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.