Lokrakshanay
Sunday, May 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी पाहणी; पावसाळ्यापूर्वीच सागरी किनारा प्रकल्पातील बोगद्यांना गळती

महानगरपालिका प्रशासनाच्या महत्वाकांक्षी अशा सागरी किनारा रस्ता प्रकल्पातील बोगद्यांत पाणी झिरपत असल्याचे दिसून आले. अवाढव्य खर्च करून साकारलेल्या सागरी किनारा रस्ता प्रकल्पातील बोगद्याला गळती लागल्यामुळे पालिकेवर टीकेची झोड उठली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 29, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी पाहणी; पावसाळ्यापूर्वीच सागरी किनारा प्रकल्पातील बोगद्यांना गळती
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : महानगरपालिका प्रशासनाच्या महत्वाकांक्षी अशा सागरी किनारा रस्ता प्रकल्पातील बोगद्यांत पाणी झिरपत असल्याचे दिसून आले. अवाढव्य खर्च करून साकारलेल्या सागरी किनारा रस्ता प्रकल्पातील बोगद्याला गळती लागल्यामुळे पालिकेवर टीकेची झोड उठली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी करून यंत्रणांना तात्काळ दुरुस्तीच्या सूचना दिल्या. तसेच, दुरुस्ती कामादरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नसल्याचेही शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. महापालिकेने मोठ्या थाटामाटात सागरी किनारा रस्ता प्रकल्पातील एक बाजू ११ मार्च रोजी खुली केली. लवकरच त्याची दक्षिण मार्गिका सुरु करण्यात येणार आहे. चौदा हजार कोटी रुपये खर्च करून पालिकेने हा प्रकल्प सुरु केला आहे. मात्र, पावसाळा सुरु होण्यासाठी काही आठवडे शिल्लक असतानाच बोगद्यांना गळती लागल्याने प्रकल्पातील कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच, या मार्गावरील सुरक्षेबाबतही चर्चांना उधाण आले आहे. सोमवारी सायंकाळी बोगद्यांच्या छतावरून पाणी ठिबकत असल्याचे दिसून आले. बोगद्यात ठिकठिकाणी भिंतीवरून पाणी झिरपत होते. बोगद्याच्या सांध्यांमधूनही गळती होत असून भिंतींमध्ये ओलसरपणा पसरला होता. गळती होत असल्याचे समोर येताच पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बोगद्याची पाहणी केली. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पाहणी करून दुरुस्ती प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी टनेल एक्सपर्ट जॉन यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. बोगद्यातील गळती थांबवण्यासाठी तात्काळ दुरुस्तीकाम हाती घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

ही गळती थांबवण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. तसेच, त्यासाठी पॉलिमर ग्राऊटींगच्या इंजेक्शनचाही वापर केला जाणार आहे. केवळ तात्पुरता उपाय नव्हे, तर गळतीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला जाणार आहे. गळतीमुळे बोगद्याच्या मुख्य रचनेला कुठलीही बाधा निर्माण झालेली नाही. त्यामुळे दुरुस्तीकाम लवकरच पूर्ण होईल. तसेच, या दुरुस्तीदरम्यान वाहतूक सुरळीत राहील, अशी माहिती शिंदे यांनी दिली. बोगद्याच्या दोन्ही बाजूला मिळून एकूण ५० जॉइंट्स आहेत. दरम्यान, केवळ गळती लागलेल्या सांध्यांची दुरुस्ती न करता सर्वच सांध्यांमध्ये गळती होणार नाही, यादृष्टीने उपाययोजना करण्याचेही आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. काही दिवसांपूर्वी समुद्रातील भरतीच्या वेळी हाजीअली येथील अंडरपासमध्ये पाणी साचले होते. तसेच, सागरी किनारा रस्ता मार्गावर भेगा पडल्याचेही फोटो समाजमाध्यमांवर फिरत होते. यावेळीही पालिकेच्या नियोजनावर मुंबईकरांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. वारंवार निर्माण होत असलेल्या समस्यांमुळे आणि आता बोगद्यातील गळतीमुळे विरोधकांकडूनही पालिकेवर चौफेर टीका करण्यात येत आहेत.

Previous Post

बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्स बारवर कारवाई करा, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे आदेश

Next Post

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा आदेश; रस्त्यांची कामे ७ जूनपर्यंत पूर्ण न झाल्यास कंत्राट रद्द करा

Next Post
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा आदेश; रस्त्यांची कामे ७ जूनपर्यंत पूर्ण न झाल्यास कंत्राट रद्द करा

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा आदेश; रस्त्यांची कामे ७ जूनपर्यंत पूर्ण न झाल्यास कंत्राट रद्द करा

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.