Lokrakshanay
Wednesday, April 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

खरात प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणार! कुठल्याही परिस्थितीत शिक्षा होणारच, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 23, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई
खरात प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणार! कुठल्याही परिस्थितीत शिक्षा होणारच, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण बाहेर येताच अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली स्वतःच्या ऑफिसमध्येच या महिलेशी अश्लील चाळे केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आधी हा भोंदूबाबा महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवून धार्मिक विधीचे ढोंग करताना दिसत आहे. दरम्यान, याप्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, ”कथित शक्तींचा उपयोग करुन महिलांना भरीस पाडणे यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही. काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागेल. सरकार आणि पोलीस याकरता जे करावं लागेल ते करेल. अशोक खरात याच्याशी संबंधित असलेल्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले जात आहेत. पण राजकीय व्यक्तींचे फोटो कोणसोबतही असू शकतात. ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन खरातसाठी ४० किलोमीटरची पाण्याची लाईन मंजूर केली, त्यांना काय शिक्षा द्यावी? मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे या मुद्द्यावर शांत का बसतात? आम्हाला या सगळ्याचे राजकारण करायचे नाही”. दरम्यान, या प्रकरणाचा वरिष्ठ स्तरावर तपास सुरु आहे. मी स्वत: राज्याच्या पोलीस महासंचालकांना या प्रकरणावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. त्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले आहे.

नाशिक पोलीस आयुक्त आणि एसआयटी मिळून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात दोषी असलेल्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. ते पुढे म्हणाले की, ‘आम्हाला कल्पना होती की, सामाजिक दबावामुळे अशा प्रकरणांमध्ये महिला एकदम पुढे येत नाहीत. त्यामुळे पीडित महिलांना आणि त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही प्रमाणात महिला याला प्रतिसाद देत आहेत. या प्रकरणाचा वरिष्ठ स्तरावर तपास सुरु आहे. मी स्वत: राज्याच्या पोलीस महासंचालकांना या प्रकरणावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे’. दुसरीकडे, अशोक खरात याला १८ मार्चच्या पहाटे नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले. पण, अटकेची चाहूल लागताच खरातने शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलात तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता, असा दावा सूत्रांनी केला आहे. दैवी शक्ती असल्याचे सांगून महिलांचे शारीरिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचा पाय आणखी खोलात जाणार आहे. खरात प्रकरणात विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू असतानाच, आयकर विभागाने खरातच्या बेनामी संपत्ती आणि उत्पन्नाचे स्स्रोत खोदून काढण्यास सुरुवात केली असून, धर्मादायकडून त्याच्या ट्रस्टमधील गैरव्यवहाराची जंत्री खोदून काढली जाणार आहे. तर तंत्र मंत्रासाठी वन्यजिवांचे अवयव वापरल्याप्रकरणी वनविभाग वनजीव कायद्यांतर्गत खरातवर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे.

Previous Post

अनुष्का शर्माचं जोरदार कमबॅक! ८ वर्षांच्या प्रदीर्घ ब्रेकनंतर पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर

Next Post

शिव ठाकरेंचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ प्रवास! ‘द ५०’ शोच्या विजेतेपदावर कोरलं नाव

Next Post
शिव ठाकरेंचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ प्रवास! ‘द ५०’ शोच्या विजेतेपदावर कोरलं नाव

शिव ठाकरेंचा 'रेकॉर्ड ब्रेक' प्रवास! 'द ५०' शोच्या विजेतेपदावर कोरलं नाव

BreakingNews

खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा

ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांनी ओलांडला शंभरीचा टप्पा

राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी ‘पिंक रूम’! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.